शिखर शिंगणापुरला जाण्यासाठी जादा बस नसल्याने नातेपुते बसस्थानकामध्ये झालेली भाविकांची गर्दी .
नातेपुते प्रतिनिधी : शिखर शिंगणापूरला महाराष्टाचे अराध्य दैवत शंभू महादेवाच्या यात्रेस प्रारंभ झाला असून या याञेसाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक येऊ लागले आहेत परंतु नातेपुतेहून शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी एस टी बसेसची कमी प्रमाणात उपलब्धता असल्यामूळे महाराष्टातून आलेल्या भाविकांना गर्दी सहन करून नातेपुते एसटी स्टँडवर ताटकळत बसावे लागत आहे नातेपुते साठी अकलूज डेपो असून यात्रेच्या काळात तरी अकलूज आगारातून नातेपुतेसाठी ज्यादा बसेस सोडण्याची शिवभक्ता कडून मागणी होत आहे
महाराष्टातील विदर्भ, मराठवाडा,कर्नाटक अशा अनेक भागातुन आलेल्या भाविकांची नातेपुते बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत असुन या ठिकाणी शिखर शिगणापुर जाण्यासाठी फक्त जादा ५ बसेसची सोय केल्याने दिवसभर भाविकांना ताटकळत बसावे लागत आहे शिखर शिगणापूरला आलेले भाविक शंभू महादेवाचे दर्शन घेऊन,गूप्तलिंग,गोंदवलेकर महाराज, विठ्ठलाचे दर्शन घेऊनच आपल्या मूळगावी परतत असतात,यासाठी भाविकांनी जादा बसेस सोडून शिखर शिंगणापुरला जाणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी होत आहे
{ बसेसची सोय झाल्यानंतर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत,तसेच पंढरपुर,बार्शी,कूर्डूवाडी,अकलूज डेपोतून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत असून भाविकांची गैरसोय होणार नाहि यांची काळजी घेतली जात आहे,
: विकास पोपळे आगार व्यवस्थापक अकलूज }
0 Comments