Hot Posts

6/recent/ticker-posts

होटगी येथील श्री 'साईलीला ' संस्थांच्या वतीने गुरुवारी भक्ती गीतांचा कार्यक्रम

होटगी येथील  श्री 'साईलीला ' संस्थांच्या वतीने गुरुवारी भक्ती गीतांचा कार्यक्रम


सोलापूर: होटगी येथील श्री साईलीला संस्थांच्या वतीने गुरुवारी दि,३० मार्च रोजी श्रीराम नवमीचे औचित्य साधून भक्ती गीतांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता काकड आरतीने उत्सवाची कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या आयोजित केलेल्या उत्साहात भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व श्रवणाचा लाभ घ्यावा. असे श्री साईलीला संस्थांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा अशी असणार

सकाळी  8 वाजता 'श्री' स महाभिषेक सकाळी 9 वाजता आणि  नित्य आरती सकाळी 10 वाजता सप्तसूर चे शिरीष जोशी व सह कलाकारांचे भक्ती गीतांचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव सोहळा व मध्यान आरती, दुपारी 12.30 वाजता महाप्रसाद वाटप दुपारी 1 वाजता रुक्मिणी भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम , सायंकाळी 6 वाजता धुप आरती, सायंकाळी 6.30 वाजता पालखी प्रदक्षिणा व शेज आरती रात्री 9 वाजता श्री साईलीला संस्थांच्या वतीने असे कार्यक्रम होणार आहेत

Post a Comment

0 Comments