असे असणार श्री येडेश्वरी मातेच्या यात्रेतील कार्यक्रम
आई तुळजाभवानीची धाकटी बहिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेस गुरुवार ६ एप्रिल ते ११ एप्रिल होत असून गुरुवार दि,६ एप्रिल चैत्र पौर्णिमेला सुरुवात होत असून चैत्र पौर्णिमा महापूजा छबिना कार्यक्रम देवीच्या मुख्य मंदिरात रात्री १० वाजता होणार आहे. शुक्रवार दि,७ एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे चुना वेचण्याचा कार्यक्रम याच दिवशी सकाळी ८वाजता देवीच्या पालखीचे आमराई मंदिराकडे प्रस्थान होईल मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम देवीच्या पालखीचे आगमन सकाळी १०वाजता चुन्याच्या रानात आल्यानंतर होईल. सकाळी ११ वाजता पालखी आमराई मंदिराकडे प्रस्थान होईल. ही पालखी आमराई मंदिरात पाच दिवस असते.
शनिवार दिनांक ८ एप्रिल रोजी पशुप्रदर्शन सकाळी ११ वाजता होणार आहे. रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता कुस्त्याचा जंगी फड रंगणार आहे तर रात्री नऊ वाजता आराधी मंडळाच्या आराधी गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दिनांक १० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून शोभेच्या दारूच्या आतिष बाजीने मिरवणूक निघून आमराई मंदिर परिसरात शोभेच्या दारूच्या आताषबाजीचा कार्यक्रम होणार आहे. तर मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता देवीच्या पालखीची पंचोपचार महापूजेनंतर घुगरी महाप्रसादाचे वाटप करून पालखीचे डोंगरावरील मुख्य मंदिराकडे वाजत गाजत प्रस्थान होईल.
असा असणार यात्रेतील पोलिसांचा फौजफाटा
येडेश्वरी मातेच्या चैत्र पौर्णिमे यात्रेस सहा एप्रिल पासून प्रारंभ होत आहे यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी यात्रा बंदोबस्तासाठी जवळपास ९०० ते १००० हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा तैनात करण्यात येणार आहे. यात्रेमध्ये लाखो भाविक दाखल होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा बंदोबस्त राहणार आहे यामध्ये एक उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४५ पोलीस निरीक्षक, पुरुष पोलीस ३५०, महिला १५०, होमगार्ड ३००, महिला होमगार्ड १५० असे कर्मचारी अधिकारी असतील अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे
0 Comments