Hot Posts

6/recent/ticker-posts

नाईचाकूर परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा, येथील पवार चव्हाण या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे साहित्यासह अन्नधान्याचे मोठे नुकसान

नाईचाकूर परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा, येथील पवार चव्हाण या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे  साहित्यासह अन्नधान्याचे मोठे नुकसान

चव्हाण कुटुंबाच्या घरामध्ये साचलेले पावसाचे पाणी

नाईचाकूर : मागील दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून सलग दुसऱ्या दिवशी मेगर्जनासह सोसायटीच्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतातील काढून ठेवलेले ज्वारी ,हरभरा, आधी पिकांसह अंबा ,चिकू, द्राक्ष, डाळिंब, चिंच अन्य फळबागांचे याचबरोबर घरांचे पडझड होऊन मोठी नुकसान झाले आहे. उमरगा तालुक्यातील नाईक चाकूर येथे बुधवारी दिनांक २६ रोजी रात्री नऊ वाजता पासून रात्रभर पावसाने झोडपून काढले विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा पाऊस झाल्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या पावसामुळे उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत असल्याने शेतकरी गारद झाले आहेत .

येथे बुधवारी झालेल्या रात्रभर अवकाळी पावसामुळे येथील रणधीर चव्हाण व माधव पवार यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने गहु,ज्वारी या अन्नधान्यसह संसार उपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे मोल मजुरी करून  उदरनिर्वाह करणाऱ्या पवार व चव्हाण कुटुंबाची नुकसान झाल्यामुळे संबंधित कुटुंबावर मोठी संकट ओढावले आहे या उपरोक्त प्रश्नाकडे ग्रामपंचायने लक्ष घालून घरासमोरील नालीची काम करून घरामध्ये पाणी शिरणार नाही याची दक्षता घेऊन योग्य विल्हेवाट लावून सदरील कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी पवार व चव्हाण कुटुंबातून होत आहे.


Post a Comment

0 Comments