काटी येथे शालेय पुर्व तयारी विद्यार्थी पालक मेळावा संपन्न !
===============================
तुळजापुर :तालुक्यातील काटी येथील जि.प.प्राथमिक शाळेत शुक्रवारी शालेय पुर्व तयारी विद्यार्थी पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे उदघाटन शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.सत्यवान रसाळ यांनी केले.इयत्ता पहिल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले.त्यांची नावनोंदणी करुन कृतीपुस्तिका भेट देण्यात आली.त्यासोबत विविध मनोरंजनपर खेळ घेण्यात आले .शाळेचे सहशिक्षक श्री.पंकज कासार काटकर यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळ,गीत,गप्पा यांच्या माध्यमातुन बोलते केले.शालेय पुर्वतयारी मेळावा साठी भाषीक,सामाजिक,बौध्दीक,भावनिक व मानसिक साहित्याची मांडणी केलेले टेबल मांडण्यात आले होते.हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मेळावा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सत्यवान रसाळ,सहशिक्षक पंकज कासार काटकर,अजित इंगळे,दैवशाला कांबळे यानी परिश्रम घेतले.
0 Comments