Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर येथे दिव्यांगांना मोफत साहित्यासाठी तपासणी शिबिर संपन्न – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा पुढाकार |Inspection camp for free materials for disabled persons completed in Tuljapur – Initiative of MP Omprakash Rajenimbalkar

तुळजापुर येथे शिबिरामध्ये  दिव्यांग बांधवासमवेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर 

तुळजापुर: धाराशिव लोकसभा मतदार संघातील आज तुळजापूर तालुक्यासाठी दिव्यांग बंधु व भगिनीसाठी एडीआयपी (ADIP) योजनेंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने मोफत वाटपासाठी पुर्वतपासणी व नोंदणी शिबिर आज दि. २१ रोजी पंचायत समिती सभागृह, तुळजापूर येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 

सदरील शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांग बंधुनी सहभाग नोंदविला सदरचे शिबिर यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी व त्यांच्या कार्यालयाच्या सर्व कर्मचारी व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. आज नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांगांना ८० दिवसात त्यांना आवश्यक असणारे साहित्या या योजनेमार्फत दिले जाणार आहे. सदरील दिव्यांगासाठी मंडप, चहा, अल्पोपहार व येण्या-जाण्याची सोय मोफत केल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद व दिव्यांगाकडून समाधान व्यक्त करण्यात आले. 

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धिरज पाटील,  राष्ट्रीयवादी काँग्रेस तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळतात्या शिंदे .महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उपतालुकाप्रमुख सुनिल जाधव, उपतालुकाप्रमुख प्रदिप मगर, शहरप्रमुख सुधीर कदम, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, युवासेना शहरप्रमुख सागर इंगळे, उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापु नाईकवाडी, विभाग प्रमुख धुळाप्पा रक्षे, महेंद्र सुरवसे, विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख विकास भोसले, अर्जुन अप्पा साळुंखे, आमीर शेख, सोशल मिडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, मुर्टा मा. सरपंच गोपाळ सुरवसे, गिरीश नवगिरे, सिद्राम आप्पा कारभारी, बालाजी पांचाळ, समाधान ढवळे, जयकुमार दरेकर, सौदागर जाधव गटविकास अधिकारी श्रीमती खिंडे, मुख्याधिकारी श्री. नाथू, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments