Hot Posts

6/recent/ticker-posts

व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी ऋषिकेश आढाव यांची निवड|Selection of Rishikesh Adhav as District President of Voice of Media Digital Department

 व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी ऋषिकेश आढाव यांची निवड|Selection of Rishikesh Adhav as District President of Voice of Media Digital Department



नातेपूते प्रतिनिधी : अवघ्या दोन वर्षांत देशातील २८ राज्य आणि २६ हजार सभासद असा अल्पावधीत विस्तार करणाऱ्या "व्हाईस ऑफ मिडीया" पत्रकार संघटना डिजिटल विभागाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी युवा पत्रकार ऋषिकेश आढाव यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.


पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी व पुण्यातीलच रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेमधील पदव्युत्तर पदवी, छ.संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरु असलेले पत्राकारितेमधील एम.फिल व गेली सहा-सात वर्षांपासून पत्रकारितेमध्ये कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जयपाल गायकवाड व सरचिटणीस के.अभिजीत यांनी ऋषिकेश आढाव यांची अधिकृत पत्राद्वारे निवड केली आहे.


देशातील पत्रकार आणि पत्रकारिता यासाठी कृतीशील कार्यक्रम राबविणाऱ्या "व्हाईस ऑफ मिडीया" संघटनेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते करण्यात आला होता. देशातील पत्रकारांसाठी निवारा, आरोग्य व शिक्षण सुविधा अशा त्रिसुत्री कार्यक्रमाच्या दिशेने या संघटनेने वाटचाल सुरू केली आहे.


उच्चशिक्षीत, अनुभव संपन्न, व पत्रकारितेकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असणाऱ्या नवोदित पत्रकारांना या संघटनेत सहभागी करून घेतले जात असून सध्या देशातील विविध राज्यातील अनेक दिग्गज पत्रकार या संघटनेत कार्यरत आहेत.


आढाव यांच्या निवडीबद्दल राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments