तुळजापुर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा झेंडा महायुतीला १४ जागा तर महाविकास आघाडीला ४ जागा
तुळजापूर : तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत महायुतीने 18 पैकी 14 जागा जिंकून बाजार समितीची एक हाती सत्ता मिळवली आहे. तर महाविकास आघाडीला मात्र चार जागेवर समाधान मानावे लागले आहे, निवडणूक निकालाची घोषणा होताच विजय पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी दुरंगी लढत रंगली होती. दोन्ही पॅनलच्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. दोन्ही गटाकडून तगडी प्रचार यंत्रणा राबवण्यात आली होती, या निवडणुकीत दोन्ही पॅनल कडून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पनाला लागली होती. या निवडणूक निकालाची घोषणा होताच भाजपच्या समर्थकांनी माजी मंत्री पद्मसिंह पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा समर्थकांनी गुलालाची व कुंकवाची मुक्त उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील विजयी उमेदवार
विजय गंगणे, सचिन पाटील, दीपक आलुरे, संतोष बोबडे, सिद्धेश्वर कोरे, प्रशांत उत्तमराव लोमटे, सुहास शामराव गायकवाड़, मागास प्रवर्गातून विजय सुधाकर शिंगाडे,भजा गटातून आशिष गणेश सोनटक्के, महिला राखीव गटातून जाधव सोनल महादेव, पवार ताराबाई राम , व्यापारी गटातून बालाजी माणिकराव रोचकरी, संतोष कल्याणराव कदम, हमाल/ तोलार मतदारसंघातून दत्तात्रय विठ्ठल वाघमारे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले,तर ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून पाटील अशोक पुंडलिक, भोसले संजय चनबस,अजा गटातून ढवळे रामचंद्र दौलतराव, आर्थिक दुर्बल गटातून जाधव सुनील चंद्रहार हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहे.
0 Comments