अवकाळी वातावरणाने शेतकरी हैराण, दिवसभराच्या उकाड्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान
सायंकाळच्या वेळेस होत असलेले अवकाळी वातावरण
तुळजापुर: तालुक्यातील परिसरात मागील चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण, दिवसभर कडक उन्हाचा चटका तर संध्याकाळी विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा पाऊस होत असल्यामुळे पावसाळ्यातील वातावरण तयार होत आहे. या वातावरणाने नागरिक व शेतकरी पुरते हैरान झाली आहेत. या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान होत आहे, तर आंबा चिंच ,चिकू , द्राक्ष या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे . मजूर टंचाईचे मोठे संकट उभे असतानाच अवकाळी पावसाच्या वातावरणाने शेतकरी हातबल झाले आहेत. तापमानाचा पारा अधिकच वाढल्याने शेतातील पिके पाणी दिल्यानंतरही भर दुपारी कोमेजून गेल्याचे पहावयास मिळत आहे. ढगाळ वातावरण, दिवसभर उन्हाचा चटका आणि सायंकाळच्या वेळेस अवकाळीचे तयार होणारे वातावरण यामुळे उकाडा वाढला असून, या असह्य उकाड्याने शेतकऱ्यांसह नागरिक हैराण झाले आहेत.
0 Comments