गळफास घेऊन ग्रामसेवकाची आत्महत्या, विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, चुकीच्या कारवाईमुळेच आत्महत्या केल्याची तक्रार
चेतन गोपीचंद राठोड वय (३२) असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे तर संदीप देशमुख असे गुन्हा दाखल झालेल्या विस्तार अधिकाऱ्यांची नाव आहे. चेतन राठोड यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुसाईड नोट ग्रामसेवक संघटनेच्या सोशल मीडिया ग्रुप वर टाकली यामुळे संबंधित इतर ग्रामसेवकांनी त्यांना तात्काळ संपर्क साधला, मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर काही वेळातच चेतन राठोड यांनी आत्महत्या केली. वरिष्ठांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे ही घटना घडल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकारी केला आहे. तसेच मृत ग्रामसेवकाचे भाऊ पंकज राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून बडनेरा पोलीसांनी संबंधित विस्तारकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
काय म्हटल आहे सुसाईड नोटमध्ये?
प्रिय बायको आणि माझ्यावर जीव लावणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींना शेवटचा रामराम. हसमुख आणि सर्वांना खूश ठेवणारा माझा स्वभाव. मी इतरांना कधी नाराज केले नाही. मी स्वतः नाराज असताना कोणाला दाखवले नाही. याचे कारण माझ्यामुळे कोणी दुःखी होऊ नये. मी 2008 मध्ये ग्रामसेवक पदावर रुजू झालो असून आजही लोक मला माझ्या कामामुळे ओळखतात. मी गावातील कोणत्याही नागरिकाला त्रास दिला नाही. 2012 -13 मध्ये मी फुबगाव येथे अतिरिक्त ग्रामपंचायतीचे काम सांभाळले. त्यावेळी अभिजित ढेपे यांच्याय प्रयत्नाने सुरेश बाबा संस्थान येथे मोठ्या प्रमाणात काम झाले. त्यानंतर माझी बदली झाली. मात्र तिथे ऑडिट झाले तेव्हा सुरेश बाबा संस्थान येथे झालेल्या कामाचे रेकॉर्ड दाखवण्यात आले नाही. त्यामुळे माझ्यावर 29 लाख रुपयांची रिकवरी काढण्यात आली. त्यावेळी पंचायत विस्तार अधिकारी देशमुख यांनी तपासणी केली. त्यावेळी मी विनंती केली आणि रिकवरी दाखवण्यासाठी थोडा वेळ मागितला. पण नांदगाव खंडे येथे मला सहकार्य करण्यात आले नाही," असे चेतन राठोड यांनी पत्रात म्हटले आहे.
0 Comments