Hot Posts

6/recent/ticker-posts

नुकसानग्रस्त शेतक-यांना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वाटप रिपाई आठवले युवक आघाडीचा अभिनव उपक्रम |Distribution of financial assistance to the affected farmers by Superintendent of Police Atul Kulkarni Ripai Athawale Youth Aghadi's innovative initiative

नुकसानग्रस्त शेतक-यांना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वाटप 
रिपाई आठवले  युवक आघाडीचा  अभिनव उपक्रम



 तुळजापूर /प्रतिनिधी:- एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस वादळी वारा गारपिटीने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून  जयंतीवरील अनावश्यक खर्च टाळून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी तुळजापूर शाखेचे युवक तालुका सरचिटणीस शुभम कदम यांच्या संकल्पनेतून नुकसानग्रस्त दहा शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदतीचे उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


दि, ११ मे  गुरुवार रोजी तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथे टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर, ग्राम पंचायत धारूर यांच्या संयुक्त विद्यमाने   जिल्हास्तरीय सेंद्रिय शेती शेतकरी नोंदणी अभियान व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडीच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेळावा समन्वयक  पोलिस निरीक्षक अजिनाथ काशिद,सामाजिक कार्यकर्ते तथा टाटा सामाजीक विज्ञान संस्थेचे ग्रामीण विकास तज्ञ गणेश चादरे, धारूळ ग्राम पंचायतचे सरपंच बालाजी पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  


याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तुळजापूर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रभारी उपसंचालक डॉ. बाबासाहेब काझी, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण तज्ञ अभिलाषा गोरे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार,उमेद अभियानचे प्रकल्प संचालिका प्रांजल शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,तुळजापूर गट विकास अधिकारी शितल शिंदे, आत्मा उस्मानाबादचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे,तुळजापूर तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी, तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डाॅ विजय जाधव, एस.एस.पीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संचालिका नसीम शेख, तुळजापूर कोव्हिजन फाऊंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डाॅ दयानंद वाघमारे, लोकप्रबोधन संस्थेचे धनाजी धोतरकर, मेळावा समन्वयक तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजिनाथ काशिद, सामाजिक कार्यकर्ते तथा  टाटा सामाजीक विज्ञान संस्थेचे ग्रामीण विकास तज्ञ गणेश चादरे, धारूळ ग्राम पंचायतचे सरपंच बालाजी पवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवक आघाडीचे तालुका सरचिटणीस शुभम कदम शरद कदम, सुरज गायकवाड,मोर्डा गावचे सरपंच ज्ञानेश्वर पांडागळे हिंमत बंडगर,गोविंद पांडागळे,प्रविण सातपुते, बळीराम सुरवसे, रामेश्वर सुळे, प्रभाकर जाधव आदिंसह  शेतकरी बांधव महिला बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments