ग्रामपंचायत पोटनिवडणूकीकडे गाव पुढाऱ्यांच्या नजरा, सोमवारी होणार चित्र स्पष्ट !
तुळजापूर तालुका ग्रामपंचायत पोटनिवडणूक रणसंग्राम
तुळजापुर: जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली असून, आता सभापती व उपसभापतींच्या निवडणुकीकडे नजरा लागले आहेत. अशातच आता निधन , राजीनामा, अनहर्ता, किंवा अन्य कारणामुळे ग्रामपंचायतीमधील सरपंच व सदस्याच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक घोषित करण्यात आले असून निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाच्या व सदस्याच्या जागा रिक्त असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये दाखल उमेदवारी अर्जाची छाननी बुधवार दि,३ रोजी तहसील कार्यालय छाननी करण्यात आली. या छाननीमध्ये सर्वच उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत, छाननीअंती तालुक्यातील कात्री ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण जागेसाठी सर्वाधिक ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, याचबरोबर तामलवाडी अनुसूचित जाती २ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे, माळुंब्रा ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग २ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर चिवरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ( सर्वसाधारण महिला) छाननीअंती सर्वाधिक ४ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान धनेगाव ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवरील बहिष्कार कायम असल्याने पोट निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. सोमवारी दि,८ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मदत आहे , यानंतर रिंगणात किती उमेदवार उरतात याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
0 Comments