Hot Posts

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त मुख्याध्यापक हभप.अशोक जाधव गुरूजी यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाकडून सपत्नीक सत्कार|Retired Principal Ashok Jadhav Guruji felicitated by the Itkal Rural Journalist Association

सेवानिवृत्त मुख्याध्यापक हभप.अशोक जाधव गुरूजी यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाकडून सपत्नीक सत्कार !
हभप.अशोक जाधव गुरूजी यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाकडून सपत्नीक सत्कार करताना


---------------------------------------------

इटकळ /दिनेश सलगरे :-  तुळजापूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक हभप.अशोक जाधव गुरुजी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.हभप.अशोक जाधव गुरुजी यांनी ३५ वर्ष शिक्षक ते मुख्याध्यापक अशी अविरत सेवा केली आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकास व गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी कार्य केले आहे,एक प्रयोगशील शिक्षक, उपक्रमशील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी अहोरात्र त्यांनी कार्य केले असल्याचे मत पत्रकार दिनेश सलगरे यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले.अशोक जाधव गुरूजी यांनी जि.प.प्रा.शाळा वत्सलानगर येथे मुख्याध्यापक असतांना विद्यार्थी यांचा विकास करीत एक आदर्श शाळा त्यांनी निर्माण केली आहे,ते नुकतेच सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाकडून फेटा शाल पेन व राजे शंभु राजे यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी बोलताना हभप.अशोक जाधव गुरूजी यांनी गोर गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणार असुन उर्वरित वेळेत प्रवचन व किर्तन करणार असल्याचे सांगितले.यावेळी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे,  केशव गायकवाड ,नामदेव गायकवाड, धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके यांच्यासह जाधव परिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments