काटी येथे लोकराजा राजर्षी शाहु महाराज स्मृतीदिनानिमित्त अभिवादन |
==============================
तुळजापुर ÷ तालुक्यातील जि.प.प्रशाला काटी व प्राथमिक शाळा काटी येथे आज दि.६ मे वार शनीवार रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानीमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.प्रशालेचे अध्यक्ष गणपत चिवरे,उपाध्यक्ष सुनिल गायकवाड,प्राथमिक शाळेचे अध्यक्ष शाहीर लाडुळकर,ज्ञानेश्वर लाडुळकर, प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी राठोड ,मुख्याध्यापक सत्यवान रसाळ,सहशिक्षक पंकज कासार काटकर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.शाहू मराजांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले गेले.विद्यार्थी ,पालक व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांकडून शाळेस प्रतिमा भेट
--------------------------------------------
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक श्री.पंकज कासार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेस अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट दिली.अशा रितीने अनोख्या पध्दतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
विद्यार्थी चित्रकला पोष्टर प्रदर्शन
=============================
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धातील चित्रकलेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी माझी आई,माझी शाळा,माझा महाराष्ट्र या विषयावर चित्रे काढली होती.विविध आकर्षक चित्र ,पोष्टरचे प्रकाशन या कार्यक्रमात झाले.
निबंध स्पर्धा व निबंधाचे वाचन
----------------------------------------------
"लोकराजा राजर्षी शाहू महाराज .जीवन व कार्य "या विषयावर विविध विद्यार्थ्यांनी निबंध लिहले होते.काही निवडक विद्यार्थ्यांच्या निबंधाचे वाचन करण्यात आले.
विद्यार्थी वार्षीक निकाल पत्रकाचे वाटप
=========================
शाळेतील आलेल्या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वार्षीक निकाल पत्रकाचे वाटप करण्यात आले.इयत्ता पहिली ते नववी च्या सर्व विद्यार्थ्यांना निकाल पत्रक वाटण्यात आले.काही निवडक विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते निकालपत्राचे वाटप करण्यात आले.
सहशिक्षक पंकज कासार काटकर यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप केला गेला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.पंकज कासार काटकर तर आभार प्रदर्शन संजय भालेराव यांनी केले.कार्यक्रमासाठी विशेष प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी राठोड,मुख्याध्यापक सत्यवान रसाळ,संजय भालेराव,हणुमंत कदम,पंकज कासार काटकर,,गुरुप्रसाद भूमकर,अजित इंगळे,श्रीमती संगिता सुरवसे,श्रीमती वैशाली क्षीरसागर,श्रीमती.दैवशाला कांबळे लिपिक श्रीकांत पांगे,सेवक किरण इगवे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments