लग्न सात दिवसावर अन् नववधुनी घेतला गळफास
बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती मयुरी
नांदेड: लग्न सात दिवसावर येऊन ठेपल्याने नववधू व वरांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते , या लगीनघाईत असलेल्या सर्वांनाच धक्का देणारी घटना शुक्रवारी दि ५ मे रोजी हदगाव तालुक्यातील अंबाळा येथे घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव तालुक्यातील अंबाळा येथील मयुरी बाळासाहेब पवार वय (२२) बी. ए. एम .एस झालेल्या उच्चशिक्षित मुलीचा विवाह दि,१२ मे रोजी शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. परंतु विवाह होण्याच्या सात दिवस अगोदर या मुलीने आपली जीवन यात्रा संपवली. अंबाळा येथील घरी असताना तिचे सतत डोके दुखत असल्यामुळे त्रासाला कंटाळुन घरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, ही घटना घरच्यांच्या लक्षात येताच त्याने तिला हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हदगाव नांदेड महामार्गावर अंबाळा हे गाव असून येथील मयुरी बाळासाहेब पवार ही बी ए एम एस च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती, दरम्यान तिचे पुणे येथील आयसीआयसीआय बँकेत उप व्यवस्थापक असलेल्या मनोज जाधव (रा.वटफळी) यांच्याशी विवाह ठरला होता, लग्नाची तारीखही काढली होती. अवघ्या दिवसावर ७ दिवसावर 12 मे रोजी लग्न सोहळा पार पडणार होता. त्यासाठी लागणारी सर्व तयारी दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आणि उपवर , उपवधुनी केली होती. जवळपास सर्वच पाहुण्यांना पत्रिकाही वाटप करण्यात आल्या होत्या.
दरम्यान शुक्रवार दिनांक 5 मे रोजी नियोजित वधू अंबाळा येथील मयुरी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, या घटनेने परिसरात हा व्यक्त होत असुन डॉक्टर होत असलेल्या मुलीने असे टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याप्रकरणी एपीआय उमेश भोसले अधिक तपास करीत आहेत.
अंबाळा येथे पंधरा दिवसापूर्वी काशिनाथ पांडुरंग पवार वय 24 या तरुणाने नैराश्यातून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. आई-वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता, याच गावातील मयुरी पवार वय (२२) वर्ष यातरुणीने आपला जीवन प्रवास संपवला.या घटनेमुळे अंबाळा येथील ग्रामस्थांवर शोककळा पसरले असून नवीन पिढी कशामुळे आत्महत्या करीत आहे, अशी चिंता आई-वडिलांना लागली आहे. परिसरातील नवयुकांना मार्गदर्शन करून या घटनेपासून कशाप्रकारे बचाव करता येईल त्यासाठी समाजप्रबोधन करणे ही काळाची गरज असल्याचे मत अनेकांतुन व्यक्त होत आहे.
0 Comments