Hot Posts

6/recent/ticker-posts

बेन्नीतूरा प्रकल्पातून पाणी उपसा करण्यास मुरूम वासीयांचा विरोध,कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

बेन्नीतूरा प्रकल्पातून पाणी उपसा करण्यास मुरूम वासीयांचा विरोध,कार्यकारी अभियंता  पाटबंधारे विभाग व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन 


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

मुरूम, ता. उमरगा येथील बेन्नीतुरा पाणी बचाव समितीच्या वतीने उमरगा येथील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्रमांक २ व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना निवेदनकर्ते








धाराशिव दि,२२ : उमरगा तालुक्यातील मुरुम येथील बेन्नीतुरा मध्यम प्रकल्पातून भुसणी, कदेर, गुंजोटी व येणेगुरसह इतर गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी सद्यस्थितीत जलजीवन योजनांतर्गत पाईपालाईन अंथरण्याचे काम सुरु आहे. सदर गावांना पाणी वितरित झाल्यास मुरूमवासीयांना आणि प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी समस्याला तोंड द्यावा लागणार आहे. खास करून "धरण उशाला कोरड घशाला" अशी गत भविष्यात होणार आहे. त्यामुळे संबंधित गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसले जातील, अश्या प्रकारचे लेखी निवेदन मुरूम शहरातील बेन्नीतुरा पाणी बचाव समितीच्या वतीने उमरगा येथील कार्यकारी अभियंता  पाटबंधारे विभाग क्रमांक २ व  उपविभागीय अधिकारी यांना गुरुवारी (ता. २२) रोजी निवेदन देण्यात आले आहे. बेन्नीतुरा मध्यम प्रकल्पातून मुरूम शहर, येणेगुर, साखर कारखाना तसेच प्रकल्प क्षेत्रातील शेतीला सध्यास्थितीत पाणी पुरवठा होत आहे. या प्रकल्पात आजतागायत मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून जवळपास तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सांडव्याची दुरवस्था झाल्याने पाणी गळती सातत्याने सुरु आहे. अश्यात जवळपास एकावन कोटी रुपये खर्ची करून जलजीवन योजनेतून भुसणी, गुंजोटी, कदेर, बेळंब या गावासाठी पाणी  पळवण्याचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे मुरूम व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना भविष्यात मुबलक पाणी मिळणे अशक्य होणार असल्याने याबद्दलची चिंता   शहरवासीयांना लागली आहे. दरम्यान सदर गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अन्यथा बेनीतुरा प्रकल्प पाणी बचाव समिती मुरुम शहरच्या वतीने मोठ्या स्वरूपात जन आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन संबंधित विभागाला देण्यात आले आहे.

या निवेदनावर बसवराज भोसगे, मोहन जाधव, मनोज खंडागळे, विकास चौधरी, गणेश जाधव, किरण गायकवाड, महेश पाटील, संजय सुरवसे, विशाल व्हणाळे, संजय बेंडकाळे, भिमराव फुगटे, ईश्वर अंबर, संजय आळंगे, राहुल जाधव, आप्पासाहेब बोराळे, जिंदावली सनाटे, गणेश झळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.                     

Post a Comment

0 Comments