प्रधानमंत्री व मुख्यमंत्री स्वयंम रोजगार योजनेतर्गतील मंजूर प्रस्तावाचे वाटप तात्काळ करा. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
धाराशिव :- सुशिक्षित बेरोजगारांना उदयोग, व्यवसाय करुन स्वावलंबी बनवण्या करीता प्रधानमंत्री स्वयंम रोजगार योजना व महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री स्वावलंबी योजनेतर्गत कर्ज प्रकरणे विविध बँकान कडून मंजूर करुन अर्थसहाय्य करण्यात येते. तसेच विविध महामंडळा कडून होतकरु नवयुवकांना प्रोत्साहन देण्याकरीता अर्थ साहाय्य करण्याचे प्रयोजन आहे. धाराशिव हा मागास जिल्हा असून त्याचा अकांक्षी जिल्हयामध्ये समावेश होतो. येथे स्थानीक पातळीवर कोणतेही औद्योगीक क्षेत्र नसल्याकारणाने नवयुवकांना पुणे-मुंबई येथे रोजगाराच्या शोधात जावे लागते. विविध महामंडळाकडे तसेच प्रधानमंत्री व मुख्यमंत्री स्वयंम रोजगार अनेक प्रकरणे मंजूर आहेत मात्र प्रत्यक्ष वाटप केले नाहीत तात्काळ मंजूर प्रकरणे वाटप झाल्यास केल्यास युवक उदयोग व्यवसाय करण्याकडे वळतील.
या अनुषंगाने खा. ओमप्रकाश राजनिबाळकर साहेब यांनी युवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हा अग्रणीय बँकेचे व्यवस्थापक सह इतर सर्व महामंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन करुन मंजूर प्रलंबित प्रकरणे तात्काळ वाटप करणेबाबत संबंधिताना सूचना दिल्या तसेच सादर प्रस्तावाकडे सहानभूतीपूर्वक पाहून उदयोग व्यवसाय स्थानीक पातळीवर उपलब्ध होण्याकरीता युवकांना मदत करण्याकरीता सूचना दिल्या याच बरोबर युवकांना वेळेत कर्ज भरणा करणेबाबत आवाहन केले आहे.
0 Comments