Hot Posts

6/recent/ticker-posts

आधुनिक भारताचे जनकः लोकराजा राजर्षि शाहु महाराज

 आधुनिक भारताचे जनकः लोकराजा राजर्षि शाहु महाराज

====================


१९ व्या शतकात आधुनिक भारताची जडणघडण करण्यात राजर्षि शाहु महाराजांचा खुप मोठा वाटा आहे. म्हणुनच ते आधुनिक भारताचे व लोकशाहीचे जनक ठरतात.

         कोल्हापुर संस्थानात वारस नसल्यामुळे कागलच्या घाडगे घराण्यातील यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेण्यात आला.हाच यशवंत पुढे राजर्षि शाहु महाराज झाले.त्यांची कारर्किद बहुजनांच्या लोककल्याणासाठी गेली.बहुजनांच्या झोपडीत विकासाचा प्रकाश गेला पाहिजे यासाठी हा ज्ञानभास्कर आपलं आयुष्य समर्पित करता झाला.

                 आज  सन २००० साली केंद्रशासनाने सक्तीचा व मोफत प्राथमिक शिक्षण हक्क कायदा केला तो शंभर वर्षापुर्वी कोल्हापुर संस्थानात शाहु राजांनी लागु केला होता.बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत,शाळेत टिकली पाहिजेत,आणि ते मोठी झाली पाहिजेत हे स्वप्नं शाहुनी साकार केलं.जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना १ रुपया दंड लावला.बहुजनांच्या मुलांसाठी शाळा काढल्या,वस्तीगृहे बांधली.तेली,तांबोळी,मराठा,माळी,धनगर,सनगर,लिंगायत,जैन,सुतार अशी वस्तीगृह काढून सामाजिक शैक्षणिक सहिष्णुता साध्य केली.पुरोहित कार्य विशिष्ठ समाजाची मक्तेदारी राहु नये म्हणुन वैदिक शाळा काढल्या.गोसावी,शिंपी,कोष्टी,जंगम,लिंगायत मुलांना पुजापाठ शिक्षण देवुन पुरोहितांची वैदिक हुकुमशाहीला त्यांनी सुरुंग लावला.

          केवळ शिक्षणच नव्हे तर सामाजिक समाजसुधारणाही लोकराजांनी केल्या.विधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी विधवा पुनरविवाह,सतीप्रथा बंद,पडदा पध्दतीला विरोध,बहुपत्नीत्वाला विरोध करुन संस्थानात कायदे केले.सामाजिक न्यायासाठी लोक अदालती भरवुन गुन्हेगारास शासन दिले.

           सामाजिक आरक्षणाची सुरुवात प्रथम लागु करुन बहुजण पोरांना सामाजिक न्याय मिळवुन दिला.पन्नास टक्के जागा राखिव ठेवल्या.वंचित,दुर्बल,पिचलेल्या,गंजलेल्या समाजास सामाजिक विकासाची संधी उपलब्ध केली.विकासाच्या मुख्यः प्रवाहात सामील करुन घेतले.त्यांना नोकर्‍या दिल्या.

            सामाजिक बरोबर धार्मिक सुधारणा केल्या.सत्यशोधक समाज व आर्य समाज यांच्या शाखा कोल्हापुर संस्थानात काढल्या.धार्मिक कर्मकांड,वेदोक्त पुजापाठ,यज्ञ,बळी,अंधश्रध्दा याला कडाडुन विरोध केला.देव आणि भक्त यांच्या मधला "दलाल पुरोहित" ही व्यवस्थाच त्यांनी नष्ट केली.बहुजनांची लग्न,अत्यंसंस्कार हे गोसावी,जंगम समाजाकडुन करुन घ्यावे असा आदेश काढला.

           काही अर्थिक,भौतिक सुधारणा संस्थानात करायला सुरुवात केली.उद्योगास चालना दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही म्हणुन मोठे उद्योग सुरु केले.कारखानदारीस चालना दिली.सुतगिरण्या,तेलगिरण्या,कापड उद्योग,मसाला,धातु उद्योग,इ.कारखाने निर्माण केले."राधानगरी" धरण बांधुन स्वतंत्र पाटबंधारे ,जलसंपदा खाते निर्माण केले.शेततलाव,तळी,बंधारे बांधून जमिनी आणि संस्थान सिंचनाखाली आणले.पर्यावरणाची काळजी घेतली.

       कला व कलाकारांना पुरस्कार दिले.कुस्त्यांचे फड उभा केले.गायन,हस्तकला,संगित,वादन,शिल्पकला,वास्तुकला यांची पुनर् बांधणी केली.कलाकारानां सन्मानाने जगण्यासाठी विशेष भत्ते दिले.कला जीवंत राहिल्या पाहिजे म्हणुन अनुदान आणि कला संस्था उभा केल्या.आजपण कुस्त्यांचे माहेरघर म्हणुन कोल्हापुर संस्थानाची ओळख आहे.ही कृपा शाहु राजांची होती.

            कोहिनुर हिरा खुप प्रसिध्द आहे.हा हिरा कोल्हापुर संस्थानास सापडला,तो हिरा म्हणजे सामाजिक आरक्षणाचे जनक लोककल्याण कारी राजर्षी शाहु महाराज होय.त्यांच्या जंयती निमित्त विनम्र अभिवादन

     स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय यांची कोल्हापुर संस्थानात सुरुवात करणार्‍या या लोककल्याण कारी भिष्मपितामहास त्रिवार वंदन.*

    👏👏🌹🌹🌹👏👏

  

    आपलाच स्नेहांकित

====================

श्री.पंकज राजेंद्र काटकर

मु.पो.काटी.ता.तुळजापुर

         जि.धाराशिव

          सहशिक्षक


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Post a Comment

0 Comments