तुळजापूर नगर परिषदेतील माने यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर: तुळजापूर नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग प्रमुख श्री.अर्जुन भगवानराव माने हे नियत वयोमानानुसार नगरपरिषद सेवेतून आज सेवानिवृत्त झाले कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा येथे निरोप समारंभ मुख्याधिकारी श्री. लक्ष्मण कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये शाल श्रीफळ, आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा इ. संपन्न झाला यावेळी त्यांच्या कार्याचा विशेष गौरव कार्यालय अधीक्षक श्री. वैभव पाठक यांनी केला व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभचिंतन केले. यावेळी समयोचीत भाषणे झाली. त्यामध्ये कर्मचारी संघटना अध्यक्ष श्री दत्ता साळुंखे, कर निर्धारक श्री.रणजीत कांबळे, श्री. शिवरत्न अतकरे, श्री.अशोक सनगले, आस्थापना विभाग प्रमुख श्रीमती बरुरकर पी.पी. श्रीमती अरुण रोकडे यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव पुर्ण उल्लेख केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.अमर ताकमोघे, श्री.महादेव सोनार, श्री.खालेदभाई सिद्दीकी, श्री.प्रमोद भोजने, श्री.नागेश काळे श्री.विशाल लोंढे, श्री.धिरज भांजी, श्री.संजय झाडपीडे, श्री.बालाजी जाधव इ.कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments