आईच्या पुण्यस्मरणाचा खर्च टाळून केले जिल्हा परिषद शाळेला शालेय उपयोगी साहित्य वाटप, पालमपल्ले परिवाराचा सुस्त्य उपक्रम
नाईचाकुर /प्रतिनिधी :उमरगा तालुक्यातील कोळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेवाडी शाळेत कै.सुंदराबाई एकनाथ पालमपल्ले यांच्या स्मृती प्रीत्यार्थ श्री मनोहर एकनाथ पालम पल्ले , डॉ.हिराचंद पालम पल्ले यांच्याकडून पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आहे.
कोळीवाडी हे गाव आदिवासी वाडी म्हणून नावा रूपाला आहे हिराचंद पालम पल्ले व मनोहर पालम पल्ले यांचे प्राथमिक शाळेत शिक्षण झाले त्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भेट दिली पाहिजे अशी संकल्पना मांडली हिराचंद पालम पल्ले यांनी ग्रामीण भागात तील विद्यार्थ्यांना शाळेत नेणाऱ्या टिफिन डब्बा वॉटर बॅग ,स्कूल बॅग भेटत नाही कोळेवाडी येथील नागरिक मोलमजुरी करून आपले जीवन जगत आहेत आपल्या पाल्याला शाळेत घेऊन जाण्यासाठी दप्तर टिफिन डबा वाटर बॅग मिळत नाही त्यामुळे हिराचंद पालम पाले यांनी या विद्यार्थ्यांना टिफिन डबा पाणी बॉटल साहित्याची वाटप केले. पालम पल्ले कुटुंबाने राबविलेल्या प्रेरणादायी उपक्रमानाबद्दल परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे .
या कार्यक्रमासाठी डॉ.हिराचंद पालमपल्ले, डॉ. संतोष सनातन ,श्री विष्णू पवार ,श्री सुधीर पवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री व्यंकट पवार, श्रीमती एस एस दिवे , शालेयय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल पालमपल्ले ,गावचे सरपंच सिद्राम पालमपल्ले तसेच उधव् पालमपल्ले, अश्विनी तडवले,
जयनंदा भंडारे व गावातील शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थितहोते. कार्यक्रमाच्या शेवटी आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होता.
0 Comments