अक्षय भालेराव हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ नातेपुते येथील आंबेडकर चौकात रस्ता रोको व निदर्शने
नातेपुते प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव या भीमसैनिकाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केली या रागातून जातीवादी गावगुंडा कडून हत्या करण्यात आली जातीवादी समाजकंटकावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी
नातेपुते येथील बौध्द बांधव, पुरोगामी विचारांच्या संघटना पक्ष यांचेवतीने डॉ.आंबेडकर चौकात रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली रस्ता रोको करण्यापूर्वी बौद्ध बांधवांच्या वतीने सर्व महामानवाच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी रिपाईचे प.महा.उपाध्यक्ष एन के.साळवे रिपाईचे प.महाराष्ट्राचे नेते युवराज वाघमारे, संघर्ष सोरटे,सुनील ढोबळे,रणजीत कसबे,लखन सोरटे,सौरभ सोरटे,बंटी सोरटे,बाळासाहेब सोरटे, समीर सोरटे,रोहित सोरटे,विशाल साळवे,मराठा सेवा संघाचे प्रा.उत्तम सावंत,डॉ.दत्तात्रय थोरात यांनी आपले विचार व्यक्त केले ज्येष्ठ नेते श्रावण सोरटे, पोपट साळवे,अमर सोरटे,विनोद रणदिवे, अजित पवार, बशीर काझी,शमशुद्दिन मुलाणी,प्रकाश साळवे, संदीप झेंडे, लखन झेंडे, राजू वाघमारे,शिवाजी भोसले, आप्पा सावंत, सुगत सोरटे,सोमा भोसले,रोहित नवगिरे , बाबा नाईकनवरे,निखिल सोरटे,विशाल सोरटे, बुद्धभूषण साळवे,प्रीतम साळवे,अमित सपकाळ,सूरज हेगडे,नितीन सोरटे,राहुल सोरटे, सिदनाक साळवे,वैभव सोरटे, बाबा नाईकनवरे आधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शहीद अक्षय भालेराव तरुणाच्या हत्याकांडातील जातीवादी गावगुंड आरोपींना कठोरातील कठोर फाशीची शिक्षा द्यावी.
आदी मागण्या संदर्भात निवेदन मंडल अधिकारी राहुल चव्हाण यांना देण्यात आले यावेळी तलाठी प्रभाकर उन्हाळे नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनि प्रवीण संपांगे उपस्थित होते
0 Comments