चिवरी येथील नवनिर्वाचित सरपंच शिवकन्या बिराजदार यांचा आ. पाटील यांच्या हस्ते सत्कार
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये विजय ठरलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंच शिवकन्या प्रशांत बिराजदार यांचा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दि,१० रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना आ. पाटील यांनी महिलांना केंद्र सरकारने उद्योग उभारणीसाठी अर्थसाह्य उपलब्ध करण्यात आले आहे याचा उद्योग उभारणीसाठी महिलांनी मदत घ्यावी, याचबरोबर गावामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध व्हावे या जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचा औपचारिक भूमिपूजन झाले असे पाटील यांनी सर्वांच्या उपस्थितीत घोषित केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटराव पाटील, उपसरपंच निर्मलाबाई लबडे, कर्नाटक राज्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष निर्मल कुमारजी सुराणा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.दिपक आलुरे, विक्रम देशमुख ,भाजपा तालुका अध्यक्ष संतोष बोबडे,आनंद कंदले, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील ,महादेव पाटील,केदार विभुते,मा. जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, वसंतराव वडगावे,साहेबराव घुगे,बाबा बेटकर, नारायण ननवरे आदीसंह तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. आप्पाराव आप्पाराव हिंगमिरे, शिवराज भुजबळ सर,याने केले तर कार्यक्रमाचे आभार पोपटराव पाटील यांनी मानले.
0 Comments