Hot Posts

6/recent/ticker-posts

अजमेरा कंट्रक्शनच्या निकृष्ट कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

अजमेरा कंट्रक्शनच्या निकृष्ट कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - कळंब शहर व तालुका हद्दीत अजमेरा कंट्रक्शनच्या माध्यमातून सुरु असलेली रोडची कामे निकृष्ट असून त्या कामांची चौकशी करावी. तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे कळंब तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२६ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीच भूमिका घेतलेली नाही.

कळंब शहर व तालुका हद्दीतील रोडची कामे अजमेरा कंट्रक्शनच्या माध्यमातून सुरू आहेत. ती सर्व कामे निकृष्ट दर्जाची होत असल्यामुळे त्या कामांची चौकशी करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर अशी मागणीसाठी वारंवार निवेदनाद्वारे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. मात्र त्या निवेदनाची दखलच घेतली नाही. त्यामुळे त्या कामांची चौकशी करावी व संबंधित अधिकारी व कन्ट्रक्शनवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विठ्ठल यादव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष कालिदास गायकवाड, शहराध्यक्ष ज्योतीराम काळे, महेश साठे व ऋषिकेश साळुंके आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments