तुळजापूर पोलीस ठाण्याच्या रात्रगस्ती दरम्यान संशयित इसम ताब्यात
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर : तुळजापूर पोलीस ठाण्याचे पथक दि. 24 रोजी 03.00 वा.सु. तुळजापूर पो. ठा. हद्दीत रात्रगस्तीस असताना दरम्यान बोरी गावातील गबर कलेक्शन कापड दुकानाच्या पत्रयाचे पाठीमागे ओल सावलीत अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एक इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- गोपाळ बाळू जाधव, वय 30 वर्षे, रा. ढाकणी ता.जि. लातुर असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांला ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्ती विरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments