नाईचाकूर येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते पाणी पुरवठ्याचा योजनेचा शुभारंभ
नाईचाकूर/ प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथे माकणी व १५ खेडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना उमरगा लोहारा तालुका अंतर्गत पाणीपुरवठा कामाचा शुभारंभ करण्यात आले यावेळी युवा नेते किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हर घर नळ योजना अमलात आणली आहे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने माकणी धरणातून पंधरा खेडे प्राधिकरण करून १५ ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठ्याचा लाभ होणार आहे
ग्रामीण भागातील नागरिक दिवसभर शेतात काम करून रात्रभर पाण्यासाठी वन वन भटकत असतात त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून येणाऱ्या दोन-तीन वर्षात उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व गावांना पिण्याच्या पाण्याची सोय करणार आहे असे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले याप्रसंगी युवा नेते किरण गायकवाड माजी सभापती गोविंदराव पवार, सरपंच चंद्रकांत स्वामी ,शिवसेना तालुका उपप्रमुख बि.के पवार,रावसाहेब पवार ,माणिक बापू पवार ,तानाजी भगवान पवार, गोविंद आण्णा पवार,प्रदीप पवार, शरद पवार, भीमाशंकर पवार ,माजी चेअरमन रमेश पवार ,माजी सरपंच नामदेव पवार गोपाळ पवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments