Hot Posts

6/recent/ticker-posts

इयत्ता 5 वी ते 10 वीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर करा -जिल्हा समाज कल्याण अधिकारी

इयत्ता 5 वी ते 10 वीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर करा -जिल्हा समाज कल्याण अधिकारी


 उस्मानाबाद,दि.27:  जिल्हा परिषदेअंतर्गत समाजकल्याण विभागामार्फत शासनाच्या विविध प्रकारच्या शैक्षणिक योजना राबविण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे सन 2023-24 वर्षाकरीता इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती  प्रस्तावाची मागणी करण्यात येत आहे.

पुढील वेळपत्रकानुसार प्रस्ताव सादर करावे. उस्मानाबाद तालुका - 22, 23 व 24 ऑगस्ट, तुळजापूर तालुका - 7 व 8 सप्टेंबर, लोहारा तालुका - 12 व 13 सप्टेंबर, उमरगा तालुका - 26 व 27 सप्टेंबर, कळंब तालुका - 3 व 4 ऑक्टोबर, भूम तालुका - 5 व 6 ऑक्टोबर, परंडा तालुका - 9 व 10 ऑक्टोबर आणि वाशी तालुका - 11 व 12 ऑक्टोबर 2023 रोजी या तालुक्यातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments