Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील अंगणवाडीत मुलांना गणवेश वाटप, व मदतनीस प्रतिभा ठोंबरे यांचा निरोप समारंभ

तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील अंगणवाडीत मुलांना गणवेश वाटप, व मदतनीस प्रतिभा ठोंबरे यांचा निरोप समारंभ
तुळजापूर :एकात्मिक बाल विकास सेवा योजना तुळजापूर तसेच जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सांगवी मार्डी येथील अंगणवाडी क्रमांक 409 येथील अंगणवाडीतील मुलांना,आज दिनाक,१० जुलै २०२३ रोजी,गावचे सरपंच युवराज बागल, ग्रामसेवक लाटकर, व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते अंगणवाडीतील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले, तसेच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व अंगणवाडीतील मुलांच्या माता यांच्या उपस्थितीत अंगणवाडी मदतनीस प्रतिभा ठोंबरे, यांचा निरोप समारंभ व सत्कार करण्यात आला,यावेळी गावचे सरपंच युवराज बागल,ग्रामसेवक लाटकर, अशा कार्यकर्ती विशाखा कुलकर्णी, अंगणवाडी सेविका चंदाराणी गायकवाड,बचत गट अध्यक्ष शालिनी बागल,माता अश्विनी डोलारे,राधा काकडे, सावित्रा डोलारे,पल्लवी पवार,ग्रामपंचायत सदस्या विद्या मुगुटराव, जांभुळ ठोंबरे,सदस्य किशोर कांबळे,यांच्यासह माता सदस्य यांची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments