जिल्ह्यात दुग्धजन्य पदार्थांची भेसळ करणाऱ्या आस्थापनांवर होणार कारवाई
उस्मानाबाद,दि.28 : दुध भेसळ रोखण्यासाठी आज 28 जुलै रोजी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी दुध व दुग्धजन्य पदार्थाबाबत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या परवानाधारक, वितरक, दुकान, स्टॉल आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन भेसळीबाबत कारवाई करण्यात यावी असे निर्देश संबंधित विभागाला दिले.
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक, सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, उपनियंत्रक वैद्यमान शास्त्र, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
तसेच दुध भेसळबाबत FSSAI टोल फ्री नंबर 1800222365 हा उपलब्ध करुन दिलेला आहे. या टोल फ्री नंबरवर दुध भेसळीबाबत नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले
0 Comments