Hot Posts

6/recent/ticker-posts

खामसवाडी येथील तलाठी कार्यालयाला जागा उपलब्ध करून इमारत बांधून देण्याची शेतक-यांची मागणी

खामसवाडी येथील तलाठी कार्यालयाला जागा उपलब्ध करून इमारत बांधून देण्याची शेतक-यांची मागणी

खामसवाडी दि.१६(प्रतिनिधी) : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील तलाठी कार्यालय हे खामसवाडी गावच्या लोकसंख्यने लहान पडत असुन शेतकऱ्याला या ठिकाणी थांबण्याची किंवा बसण्याची कसल्याही प्रकारची सोय नसल्याने वृध शेतकऱ्यांना याचा नहाक त्रास होतआहे. कळंब तालुक्यातील खामसवाडी हे गाव महसुली सज्जा ने मोठे क्षेत्रफळ असलेलं गाव असून या गावाला खामसवाडी सह नागझरवाडी या गावाचा समावेश असुन शेती चे  क्षेत्रफळ मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे  गावातील व नागझरवाडी येथील शेतकरी दैनंदिन कामासाठी तलाठी कार्यालयाला येतात परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी कसल्याही प्रकारचा निवारा नसल्याने शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे. 

सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस आला तर कार्यालयात शेतकऱ्यांना थांबता येत नाही. त्यामुळे दारातच पावसात उभे रहाण्याशिवाय पर्याय उरत नाही. येथील तलाठी कार्यालय हे लहान असून या कार्यालयामध्ये तलाठी भाऊसाहेब यांना देखील बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. तर आलेल्या शेतकऱ्यांना पावसातच दारात उभे राहावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबांना होते. खामसवाडी गाव हे लोकसंख्येने मोठे गाव असून या गावांमध्ये अनेक कार्यालय आहेत. त्यातीलच एक तलाठी कार्यालय असून हे तलाठी कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे. सदरील तलाठी कार्यालय हे दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी शेतकर्यांकडुन होत आहे. परंतु अनेक दिवसापासून  प्रत्यक्ष या कामास मुहूर्त लागत नाही. त्यामुळे सदरील कार्यालय तात्काळ स्थलांतरित करावे व शेतक-यांची गैरसोय टाळावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments