/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> चिवरी येथील महालक्ष्मीच्या "आकाड बोन याञेत भाविकांची मांदियाळी

Hot Posts

चिवरी येथील महालक्ष्मीच्या "आकाड बोन याञेत भाविकांची मांदियाळी

चिवरी येथील महालक्ष्मीच्या "आकाड बोन याञेत भाविकांची मांदियाळी, शेकडो भाविकांनी घेतले दर्शन
चिवरी: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी  मंदिरात दरवर्षी आषाढ महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी भरणारी आकाडबोन यात्रेत शेकडो भाविकांनी दर्शन घेऊन नवस्फूर्ती केली, भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. देवीजींना पहाटे अभिषेक ,महाआरती करून दुपारी होमवहानसमोर रूढी परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रम पार पाडून यात्रेची सांगता होते, महालक्ष्मीची दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेच्या पहिल्या मंगळवारी यात्रा भरते याला " कायरं  या नावाने ओळखले जाते तर आषाढ महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी भरणाऱ्या यात्रेला आकाडबोन  या नावाने ओळखले जाते ,यात्रेमध्ये पर जिल्ह्यासह पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला होता, यात्रे दिवशी गावातील प्रत्येक कुटुंबातून देवीला दहीभाताचा नेवैद्य दाखवला जातो, दिवसभरामध्ये लहान मुलांची जावळ काढणे, नवीन पोतराजाला दीक्षा देणे, पट बांधणे आदी नवस्फूर्तीचे कार्यक्रम होतात   यावेळी आराधी, वाघ्या मुरळी,  जान्या    ,पोतराज यांच्या गीताने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. 

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>