काळाचा घाला : सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अणदुर जवळ क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने भिषण अपघात पाच जण जागीच ठार 7 ते आठ जण जखमी -Andur Cruser Van Accident

Hot Posts

6/recent/ticker-posts

काळाचा घाला : सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अणदुर जवळ क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने भिषण अपघात पाच जण जागीच ठार 7 ते आठ जण जखमी -Andur Cruser Van Accident

काळाचा घाला : सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अणदुर जवळ क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने भिषण अपघात 4 जण जागीच ठार ७ ते ८ जण जखमी -


धाराशिव : सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अनुदुर येथील उमरगा चिवरी पाटी जवळ आज सकाळी दिनांक 22 रोजी क्रूजर गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू तर सात ते आठ गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथील कुटुंबीय देवदर्शनासाठी अणदुर- नळदुर्ग खंडोबा येथे जात असताना अनदुर उमरगा चिवरी पाटी येथे अचानक गाडीचा टायर फुटला आणि क्रूजर गाडी समोरील वाहनलाही धडक बसुन डिव्हायडर आदळली  या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की क्रूजर गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महिलांमध्ये साक्षी बडे, सोनाली कदम आणि पूजा शिंदे यांचा समावेश आहे. उर्वरित मयताची ओळख स्पष्ट झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तर आकाश कदम, हरीकृष्ण शिंदे, माऊली कदम, अंजली आमराळे, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, कुणाल शिंदे, श्लोक शिंदे, बालाजी शिंदे, शिवांश कदम आणि कार्तिक आमराळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यामध्ये जखमींना तात्काळ नळदृग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात जखमेवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर नळदृग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अणदूर नळदृग परिसरातील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदत केली या भीषण अपघाताच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघात घटनेचा  अधिक तपास पोलीस करत आहेत.

अपघात घटनास्थळाचा व्हिडिओ


Post a Comment

0 Comments