Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : अणदूर येथील बेपत्ता युवकाचा चिवरी परिसरात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

तुळजापूर : अणदूर येथील बेपत्ता युवकाचा चिवरी परिसरात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

मयत विकास जाधव

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील अनदुर येथून 16 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह शनिवारी दि,11 रोजी चिवरी मंदिराजवळील डोंगर परिसरातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नळदृग पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की अणदूर येथील विकास रमेश जाधव वय( 27 )हे 26 एप्रिल पासून घरातून बेपत्ता होते. घरातून बेपत्ता होऊन दोन दिवस झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र काही त्याचा उपयोग झाला नाही, नातेवाईकांकडून त्याचा  शोध सुरूच होता. चिवरी येथील काही जनावरे राखणाऱ्या व्यक्तींना शनिवारी दि,11रोजी देवस्थानच्या डोंगर परिसरात असलेल्या झाडाला एक मृतदेह लटकत असलेला आढळून आला. या संदर्भात त्यांनी तातडीने नळदृग पोलिसांना माहिती दिली, यावरून नळदृग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला, मृतदेह तब्बल 16 दिवसांनी निदर्शनास आल्याने मृतदेहाचा केवळ सापळा दिसत होता. मयत विकास जाधव यांच्या हातात सोन्याचे ब्रासलेट व कानातील कुंडल होते, यासोबतच एक मोबाईल हँडसेट जवळ पडलेला होता. या सर्व साहित्यावरून हा मृतदेह विकास जाधव यांचाच असल्याची पोलिसांना ओळख पटली. विकास जाधव यांची बंधू आकाश जाधव यांच्या माहितीवरून नळदृग पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये काही घातपात आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान विकास बेपत्ता झाल्यानंतरही त्यांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, या घटनेमध्ये घातपात किंवा अन्य काही घटना घडली आहे का याचा शोध नळदुर्ग पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments