Hot Posts

6/recent/ticker-posts

वडील म्हणजे सर्वश्रेष्ठ दैवत : गणेश महाराज भगत कै. हणमंत बाबुराव झगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तताने किर्तनसेवा संपन्न

वडील म्हणजे सर्वश्रेष्ठ दैवत : गणेश महाराज भगत           कै. हणमंत बाबुराव  झगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तताने किर्तनसेवा संपन्न 

नातेपुते प्रतिनिधी : वडील म्हणजे आपल्या घराचं अस्तित्व आपल्या धर्मामध्ये आई वडिलांनाच परमेश्वर मानले आहे मातृदेवो भव पितृदेवो भव या वचनातून अभिव्यक्ती होते वडील म्हणजे एक व्यक्ती नसून वडील म्हणजे मांगल्य,वात्सल्य,प्रेम,जिव्हाळा, सात्त्विकता, ऋजुता इत्यादी भाव भावनांचे उत्कट दर्शन म्हणजे वडील शहरी वा ग्रामीण, सुशिक्षित वा अशिक्षित,श्रीमंत व गरीब वा वृद्ध असले,तरी अखेरीस तो वडीलच असतों,                    वडील म्हणजे चैतन्याचा अखंड झरा आपल्या जीवनामध्ये सर्व आश्रय संपतात पण वडिलांचा आश्रय कधीच संपत नाही. सर्व अपराध पोटात घेणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे वडील असतात आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा आहे, वडील म्हणजे मुलांच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ दैवत आहे   नातेपुते येथील तुकाराम हणमंत  झगडे यांचे वडील कै. हणमंत बाबुराव झगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तताने  ह भ प गणेश महाराज भगत यांनी नातेपुते येथील किर्तनसेवेत  सांगितले,पृथ्वीतलावर नरदेह धारण करण्यास स्वर्गातील देवहि उत्सुक आहेत.आम्ही मात्र नरदेहाच्या प्राप्तिने धन्य झालो आणि कारण आम्ही विठोबाचे दास झालो या नरदेहच्या प्राप्तिने भक्ती करावी व भक्तिमार्गातील सच्चिदानंद पदवी प्राप्त करवी, या नरदेहप्राप्तीने जीवनाचे सार्थक करू घेऊ, इहलोकींचा हा देह | देव इच्छिताती पाहें |धन्य आम्ही जन्मा आलों ।

दास विठोबाचे झालों ॥ या अभंगावर महाराजांनी चिंतन केले     कै,हणमंत झगडे तात्या हे पांडुरंगाचे व शंभू महादेवांचे निस्सीम भक्त होते. वारकरी भाविकांची सेवा, दररोज नित्य नेम,नामस्मरण,देव दर्शन,परमार्थ करत शेती व्यवसाय करून परमार्थिक जीवन त्यांनी साध्य केले आणि हरिनाम घेत घेत आपला देह ठेवला, कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी लसूण, मिरची, कोथिंबिर,अवघा झाला माझा हरी अशा शब्दांत महाराजांनी आपल्या किर्तनसेवेमध्ये  आपल्या भावना व्यक्त केल्या                 

सकाळी १० ते १२ यावेळेत किर्तन होऊन आरती पसायदान महाप्रसाद होऊन कार्यक्रमांची सांगता झाली.या कार्यक्रमाच्या प्रसंगी नातेपुते गावातील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर मंडळी, समस्त  नातेवाईक मंडळी, झगडे परिवार, नातेपुते भजनी मंडळ व नातेपुते  परिसरातील आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments