Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर येथील विद्युत महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले

तुळजापूर येथील विद्युत महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले
तुळजापूर : तालुक्यातील आपसिंगा येथील ए. जी.जॉईन असलेला विद्युत पुरवठा हा गेली काही महीन्यापासुन सातत्याने बंद केला जात आहे. सध्या मशागतीची कामे चालु असल्याने तसेच अनेक शेतकरी हे शेतामध्येच राहात असल्याने त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहेत. तसेच गेली काही दिवसापासुन सदर भागात चोऱ्याचेही प्रमाण वाढलेले आहे. तसेच सदर ए.जी. लाईनवर तुळजापूर येथील, पांडुरंग नगर, लक्ष्मी नगर हा भाग असुन सदर लाईन ही काही खाजगी गुत्तेदाराकडुन प्लॉटींग करतेवेळी तोडली गेली असुन तेथील लाईनचे काम हे व्यवस्थीत झालेले नाही,त्यामुळे थोडाही पाऊस पडल्यास अथवा वारा सुटल्यास आपसिंगा, कात्री, कामठा, तुळजापूर (खुर्द) या ठिकाणची लाईट ही बंद पडत आहे. त्यामुळे त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

तरी याबाबत आपण तात्काळ उपाय योजना करुन सदर ए. जी. लाईन दुरुस्त करुन शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी आज दिनाक ११ जुलै २०२३ रोजी जिल्हाअध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली,विद्युत वितरण विभागीय कार्यालय तुळजापूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले,लेखी आश्वासनानंतर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले,यावेळी जिल्हा रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे,राजाभाऊ हाके,गुरू भोजने,प्रदीप जगदाळे, यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments