नाईचाकूरच्या उपसरपंच पदी भीमाशंकर पवार यांची बिनविरोध निवड
नाईचाकूर प्रतिनिधी: उमरगा तालुक्यातील नाई चाकूर ग्रामपंचायत चे तत्कालीन उपसरपंच बालाजी पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे दि,14 रोजी उपसरपंच पदासाठीनिवड प्रक्रिया पारपडल्ली यात भीमाशंकर पवार यांचा एकमेव आज आल्यामुळे त्यांना नाई चाकूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.नाईचाकूर येथे अडीच वर्षांपूर्वी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक झाली होते या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना व काँग्रेस पक्षाची महाआघाडी करून निवडणूक लढवली होती .
आमदारा ज्ञानराज चौगुले यांचे खंदे समर्थक बालाजी पवार हे बालाजी पवार यांनी नाईचाकूर येथे विकास कामे खेचून आणत होते त्यांनी 33के व्हि,15खेडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना स्थानिक रस्ते विकास कामे करत होते पण अचानक त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले बालाजी पवार यांना विचारले असता मी उपसरपंच पदावून पायउतार झालो असलो तरी नाई चाकूर येथील विकास कामे व गोरगरिबाचे कामे मी करत राहीन मी आज उपसरपंच नसलो तरी मी जनतेचे कामे करे व गावात विकास कामे करण्यास सर्वांना मदत करेल असे म्हटले विकास कामात कुठलाच अडथळा न करता आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून विकास निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करेन व नाईचाकूर येथील सरपंच उपसरपंच यांना मदत करेन असे म्हटले
अध्यासी अधिकारी म्हणून श्री एन. एस .राठोड विस्तार अधिकारी पंचायत समितीचे उमरगा तलाठी युवराज पवार, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर नलावडे ग्राम पंचायत सदस्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments