कृषि विभागाच्या योजनांचा स्वयंसहाय्यता गटाला लाभ घ्यावा: सतीश कचरे मंडल कृषि अधिकारी नातेपुते प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन कृषि विभाग मंडळ कृषि अधिकारी नातेपुते , आत्मा माळशिरस व महिला आर्थिक विकास महामंडळ अगीकृत यशोदिप लोकसंचलीत साधन केद्र फोडशिरस याचे सयुक्त विद्यामान संस्थेच्या ६व्या वार्षिक सभेचे औचित्य साधन महिला बचत गट लाभार्थीचा प्रशिक्षण कार्यकम व डाळीब महिला लाभार्थी ची मुल्यवर्धन व्हीसीडीस शेतीशाळाच्या वर्गाचे संयुक्त रित्या आयोजन १ ३ जुलै ला फोडशिरस येथे करण्यात आले होते .
सदर कार्यक्रमास नातेपुते मंडळ कार्यक्षेत्रातील १३ गावचे पंचक्रोशीतील ३४२ गटाच्या ४१० शेतकरी महिला सदस्यानी सहभाग नोदविला सदर कार्यक्रमास माळशिरस तालुका शिवसेना अध्यक्ष डाळीब रत्न श्री राजकुमार हिवरकर पाटील यांनी प्रमुख पाहुणे भाषणात स्वयसहाय्यता गटासाठी असलेल्या सर्व विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा व प्रत्येक वाढदिवसाला शासकिय दवाखान्यातून पूर्णतः आरोग्य तपासणी साठी सर्वतः सहाकार्य करण्याचे आश्वासन दिले. यशोदिपच्या स्मार्ट मधून मजूर प्रकल्पाला निर्यात साठी मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . श्री शामराव टेळे बीओआय कृषि विकास पढरपुर यांनी स्वयंसहायता गट व कृषि कर्ज योजना कार्यप्रणाली बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. बीओआय नातेपुते व्यवस्थापक श्री सुनिल गाडे व गुरसाळे व्यवस्थापक श्री विठ्ठल पाटील यांनी ऐ ग्रेड गटांना प्राधान्याने कर्ज पुरवठा करण्यास मदत व सहाकार्य केले जाईल याचबरोबर कर्ज थकीत न ठेवता नियमित कर्ज फेडून बॅकला सहकार्य व स्वतःचे सिबील स्क्रोर ठेवण्याबाबत अहवान केले.
सदर कार्यक्रमास श्री पोपट बोराटे संरपच फोडशीरस , सौ सुरेखा हुबे सरपंच हनुमानवाडी , सौ सुचित्रा शिदे संरपच शिदेवाडी यांनी विशेष उपस्थितीत दाखविले श्री सतीश भारती सहा जिल्हा समन्वयक श्री राजकुमार पवार जिल्हा उपजिविका सल्लागार व श्री उमेश तालुका उपजिविका सल्लागार यांनी स्वयंसहायत्ता गट व उपजीवीका व्यवसाय बाबत अर्थकारण समजावून सांगितले . श्री रणजीत शेंडे तालुका व्यवस्थापक यांनी स्वय उत्स्फुर्त उपस्थिती सहभाग व लाभ घेणेबाबत अहवान केले. कृषि विभाग आत्मा श्री कुलदिप ढेकळे यांनी मंजूर स्मार्ट प्रकल्प डाळीब मुल्यवर्धन व्हीसीडीएस शेतीशाळा व गट साठी पी एम एफ मी योजनाबाबत मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी नातेपुते श्री सतीश कचरे यांनी आपल्या संबोधनात गटासाठीच्या कृषि विभागाच्या योजना मध्ये औजार बॅक , ऐआयएफ, सीआयएफ , पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासम्मान निधी ईकेवायसी आधार सिडीग करून वार्षीक १२ हजार लाभ घेण्याचे अहवान केले.
स्मार्ट प्रकल्प अंतर्गत डाळीब निर्यातीसाठी बागेची नोंदणी, GI मानाकन व निर्यात परवाना बाबत ही सखोल माहिती दिली. सर्व उपस्थितीत मान्यवराचे हस्ते क्राती ज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करून विनम्र अभिवादनाने सुरुवात करून उपस्थितांचे अपारंपारिक पद्धतीने गुलाब मोगरा रोपे देऊन यशोधीत सन्मान संस्थेच्या अध्यक्ष सौ उज्वला वारे, सचीव सौ तनुजा भोसले सहसचीव शोभा वाघमोडे व संस्था कार्यकारणी सदस्याचे हस्ते करण्यात आला . कार्यक्रमाची प्रस्तावना श्री प्रताप वाघमोडे व्यवस्थापक यशोदिप साधन केंद्र यांनी केले . कार्यक्रमाचे आयोजन नियोजन अमंलबाजवणी यशस्वी पार पाडण्यासाठी श्री प्रताप वाघमोडे ,श्री हनुमंत खरात कृस फोडशीरस , सौ रेश्मा क्षीरसागर तसेच संस्थेचे गट व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले .
0 Comments