तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विद्यार्थी अशरफ मुलानी व विजय महाडिक यांची पीएसआय पदी नियुक्ती
बारामती/विलास भोसले : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा संख्याशास्त्र विभागाचा विद्यार्थी अशरफ मुलानी व राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू व मराठी विभागाचा माजी विद्यार्थी विजय महाडिक यांची नुकतीच पीएसआय पदी नियुक्ती झाली. बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये त्यांनी पदवी चे शिक्षण घेतले. अभ्यासामध्ये सातत्य राखत परिश्रम घेऊन त्यांनी हे यश संपादन केले जिद्द व चिकाटी न सोडता प्रयत्न केले व यशश्री खेचून आणली. त्यांना मिळालेल्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शहा वाघोलीकर, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक
,शिक्षक यांनी अशरफ मुलाणी तसेच राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू व मराठी विषयाचा श्री. विजय महाडिक यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments