Hot Posts

6/recent/ticker-posts

रायसिना फाउंडेशन व गोर सेना तुळजापूर तालुका यांच्यावतीने वडाचा तांडा येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार

रायसिना फाउंडेशन व गोर सेना तुळजापूर तालुका यांच्यावतीने वडाचा तांडा येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार 
तुळजापूर: तालुक्यातील वडाचा तांडा येथील श्री संत सेवालाल महाराज सभागृह येथे रायसिना फाउंडेशन व गोरसेना तुळजापूर तालुका यांच्यावतीने चालू वर्षात दहावी बारावी मध्ये उत्कृष्ट प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी  सह विविध क्षेत्रांमध्ये  चमकदार कामगिरी केलेल्या बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला. सध्याच्या युगात शिक्षणापासून दूर असणाऱ्या बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरी बाबत योग्य ती  मान सन्मान देऊन पुढील शिक्षणासाठी किंवा आयुष्यासाठी त्यांना ऊर्जा मिळावी तसेच समाजातील इतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने रायसीना फाउंडेशन व गोरसेना तुळजापूर तालुका यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला

या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून राज्य संयोजक देविदास राठोड सर ,चार्टर्ड अकाउंटंट तानाजी चव्हाण सर, लालसिंग राठोड , लखन चव्हाण राजू चव्हाण ,वसंत पवार, दामाजी राठोड ,उमेश पवार, अविनाश राठोड, अनिल राठोड, दिनेश राठोड, शिवराम राठोड, सरपंच विजया चव्हाण, राजू चव्हाण,विकास चव्हाण, अमोल राठोड इ. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments