Hot Posts

6/recent/ticker-posts

आपल्या हक्काची लढाई लढावी लागेल - रमेश तात्या गालफाडे

आपल्या हक्काची लढाई लढावी लागेल - रमेश तात्या गालफाडे

पिंपरी चिंचवड : राज्यात मातंग समाजावरील  सातत्याने अन्याय वाढत असून, या समस्या सध्या समाजाला भेडसावत आहेत,त्यासाठी मातंग समाजाची एकजूट घडूवून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी केले

१८ जुलै ते २० जुलै पायी दवंडी मोर्चा मंत्रालयावर धडकणार असून याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरात मातंग समाजाच्या विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन रमेश तात्या करत होते.

या मोर्चाला राज्यातून मातंग समाज एक संघ होत असतानाच समाज प्रबोधनाच्या माध्यमातून राज्याचा दौरा करून मातंग समाजाच्या समस्या समजावून घेऊन रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचं रमेश तात्या गालफाडे यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments