Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबई येथे सुरू असलेले आंदोलनातून काहींनी घेतली माघार,तर काहींचे सुरूच ,तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई येथे सुरू असलेले आंदोलनातून काहींनी घेतली माघार,तर काहींचे सुरूच ,तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत माहिती

प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव


तुळजापुर : मुंबई येथे सुरू असलेले आंदोलनातून  आम्ही सुनिल नागणे,योगेश केदार, प्रतापसिंह कांचन पाटील,या तींघानी ५०% च्या आत ओबीसी मधुनच गोरगरीब सामान्य मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी 6 मे 2023 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी शक्तिपीठ श्री क्षेत्र तुळजापूर ते मंत्रालय मुंबई पर्यंत 31 दिवस पायी चालत निघालो होतो. 6 जुन 2023 रोजी विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दीन दिवशी आझाद मैदान मुंबई येथे पोचलो असता त्याच दिवशी पासुन आमच्या आरक्षण हक्कासाठी मैदानावर ठिय्या मांडून बसलो होतो, की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही तसेच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्यानं मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले दुसरे उपुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी गोरगरीब सामान्य मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण न्याय देण्यासाठी आमच्या सोबत चर्चा करण्यास आझाद मैदानावर यावं अशी भावना व्यक्त केली होती .

परंतु गेल्या 81 दिवसातल्या घडामोडी पाहिल्या, तर भुम परंडा तालुक्यातील लोकप्रतनिधी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननिय तानाजीराव सावंत साहेब है आझाद मैदानावर उपस्थीत राहून सहभाग नोंदवला होता. त्यानंतर धाराशिव कळंब चे आमदार कैलास पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात आमची मागणी बाबत प्रश्न उपस्थित केला असून वरील दोघेजण सोडले तर कोणीही मराठा वनवास यात्रा आझाद मैदानावर ठाण मांडून बसली असताना आले नाहीत शेतकरी कष्टकरी कामगार विध्यार्थी असलेल्या गोरगरीब सामान्य मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही एकमेव मागणीसाठी आंदोलन करत असतानाच लोकप्रतिनिधींकडून अक्षरशः त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामूळेच आज आम्ही सामान्य मराठा समाज आरक्षणापासून वंचित असल्यानं आमचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नोकरी व शैक्षणीक, आर्थिक नुकसान होत असल्याने एवढा संघर्ष सुरु ठेवला होता तरीही असं का होतं आहे तर आम्हाला लक्षात आले की आमच्या सोबत असलेला एक सहकारी योगेश केदार हा सातत्याने आंदोलन सोडून मुंबई बाहेर जाणे आणि समाजाच्या नावावर आर्थिक जमवाजमव करणे याला,आम्ही नेहमीच विरोध केला होता. तरीही त्यांनी आमचे सांगण्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करून अनेक ठिकाणी जनजागृती करण्याच्या नावाखाली स्व:तच आर्थिक स्वार्थ साधण्याच आणि आम्हाला गोरगरिब सामान्य मराठा समाजाला फसवण्याच काम करीत आहेत हे लक्षात आले.

 त्यामुळे दिनांक 26/07/2023 पासूनच प्रतापसिंह कांचन पाटील व सुनिल नागणे मराठा बनवास यात्रा आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत अशी घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली आहे...

कारण ज्या लोकप्रतीनिधीकडून आमचा हक्क अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा तो केला जात नसेल तर आम्ही या ठिकाणी तुळजापूर ते मुंबई पायी चालत आलो आणि आज पावसात उभे राहून आंदोलन असताना ही यांना जर गरीब मराठा समाजाची जाण नसेल तर आम्ही यापुढे आमदार असो की खासदार मंत्री यांना यांच्या घरी जाऊन शांततेच्या लोकशाही मार्गाने गोरगरीब सामान्य मराठा समाजाला घटनात्मक 50% आतील ओबीसी मधुनच आरक्षण न्याय मिळवून द्यावे म्हणून निवेदाद्वारे मागणी करून विनंती करू जर सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमची मागणी बाबत चर्चा करून 50% आतील गरीब मराठा समाजाचा हक्क आहे की नाही केली तर मात्र नाविलाजास्तव आम्हाला आरक्षण या अन्यथा राजीनामा या.. अशी मागणी महाराष्ट्रातील मराठा समाज आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन करेल याचसाठी आम्ही राज्यभरातील जनजागृती करण्यासाठी कटिबद्ध असुन त्यासाठी प्रामाणिकपणे पुन्हा समाज


एकत्र करून सर्वसमावेशक एकत्र मराठा सर्वत्र मराठा व एकमुखी 50% आतील ओबीसी मधुनच गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मागणी मान्य करावे व आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न जनजागृती करीत असणारं अशी याची घोषणा करतो आहोत,त्या संदर्भात आज दिनांक 30/7/2023 रोजी तुळजापूर येथील शासकीय विश्रामृहात पत्रकार परिषद घेण्यात आली,यावेळी मराठा वनवास यात्रेचे सुनील नागणे,प्रतापसिंह कांचन पाटील,विशाल सावंत,सोमनाथ जाधव, औदुंबर खलाटे,उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments