Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे एकास आर्थिक कारणावरून बेदम मारहाण , नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

चिवरी येथे एकास आर्थिक  कारणावरून बेदम मारहाण , नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव 

तुळजापुर: तालुक्यातील चिवरी येथील इंदिरानगर मधील रहिवासी , ज्ञानेश्वर अभिमन्यू जाधव यांना आर्थिक कारणावरून दोघा जणांनी बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील  संजय चव्हाण,  शंकर पवार व अन्य दोघे यांनी आर्थिक व्यावहारचे कारणावरुन दि.9 रोजी  इंदीरानगर चिवरी येथे फिर्यादी नामे- संगिता ज्ञानेश्वर जाधव, वय 27 वर्षे रा.इंदीरानगर, चिवरी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे पती नामे ज्ञानेश्वर अभिमन्यु जाधव यांना घरात घुसुन जातिवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान करुन जिपमध्ये घालून घेवून गेले. अशा मजकुराच्या संगिता जाधव यांनी दि.09.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-365, 452, 323, 504, 506, 34, सह अ.जा.ज. प्र. का. कलम 3(1) (आर),  3(1) (एस), 3 (2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments