Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी शिवारात वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टकडुन राबवण्यात आलेल्या पाणलोट विकास कामाचा शेतकऱ्यांना दिलासा

चिवरी शिवारात वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टकडुन राबवण्यात आलेल्या पाणलोट विकास कामाचा शेतकऱ्यांना दिलासा


तुळजापुर: तालुक्यातील चिवरी  येथे वॉटर शेड‎ ऑर्गनायझेशन ट्रस्टतर्फे पाणलोट‎ विकास कार्यक्रमाची सुरवात‎ करण्यात आली होती, तालुक्यातील 20 गावात राबवित असलेल्या  धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रम या प्रकल्पा अंतर्गत व इंडसइंड बँक याच्या अर्थसहयातून  चिवरी शिवारात लोकांच्या सहभागातून  मोठ्या प्रमाणात पाणलोटाची कामे झाली  आहेत . यामध्ये गावात‎ ‎ असणाऱ्या नाला, ओढ्याचे‎ रुंदीकरण , खोलीकरण,  माथा ते पायथा या पद्धतीने  शेताची बांधबंदिस्ती ,व्हॅट, अनघड दगडी बांध, माती नाला बांध, नाला खोलीकरण  आदी उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात चिवरी शिवार पाणीदार होताना दिसत आहे .या झालेल्या कामामुळे भूजल पातळीत वाढ होऊन  मोठ्या प्रमाणात रब्बी क्षेत्रात वाढ होणार आहे . 



हे काम झाल्यामुळे सध्याची स्थिती बघता पाऊस कमी पडला असून पडलेला पाऊसाचे पाणी अडविल्यामुळे इतर गावाच्या तुलनेत शिवारात पाणीच पाणी बघायला मिळत आहे त्यामुळे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट तर्फे राबविण्यात आलेल्या शिवारातील शेतकरी राजा सुखावला आहे . .यामुळे‎ शेतकऱ्यांच्या पिकांना बारा महिने पाणी‎ उपलब्ध होणार आहे जलसाठा भूगर्भात‎ व्हावा व पाण्याचा नियोजनबद्ध‎ वापराच्या उद्देशाने या कामाची‎ सुरुवात करण्यात आली आहे. एकंदरीत या संबंधित संस्थेने पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात फायदा होणार आहे.

Post a Comment

0 Comments