पाचपिंपळा येथे पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणार--पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
धाराशिव ,दि.०८ :- धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथे पंचक्रोशीतील नागरीकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्या पाहिजे.यासाठी तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर करावा.या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाचपिंपळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात येईल.असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केले.
आज 8 ऑगस्ट रोजी परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते विविध कामांचे भूमीपूजन करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.जिल्हा परिषदेचे माझी सभापती धनंजय सावंत,माझी सभापती दत्ता साळुंके, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजंल शिंदे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास, सरपंच वंदना चौधरी, माऊली गोडसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.डॉ. सावंत म्हणाले, गावाच्या विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे.गावात सुरू असलेली कामे ही गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी सुरु असलेल्या कामांना वेळोवेळी भेट देऊन पाहणी करावी.झालेली कामे टिकुन राहतील यासाठी प्रयत्न करावा. पाचपिंपळा येथे लवकरात लवकर शेतकरी व पशु पालकांसाठी पशु वैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात येईल.असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते जल जीवन मिशन अंतर्गत 69 लक्ष रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे,जन सुविधा योजनेतंर्गत गावातील सिमेंट रस्त्यासाठी 20 लक्ष रूपये,25/15 या लेखाशिषातून गावातील सिमेंट रस्त्याच्या 10 लक्ष रुपयांच्या कामाचे तसेच अन्य विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले.
0 Comments