मंगरूळ येथील आश्रम शाळामधील अधिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर कार्यवाही करावी,पोलीस अधीक्षक यांना भीमा-आण्णा सामाजिक संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम शाळा येथील अधिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर कार्यवाही करावी, यासाठी विमाना सामाजिक संघटनेने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की ,संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम शाळा मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या शाळेत मुख्याध्यापक कोरे टी. व्ही,व अधिक्षक म्हणून गिरासे. वाय. बी, हे कार्यरत आहे. दिनांक. १९/०८/२०२३ रोजी संदीप बबन कांबळे इ.१० वीत शिकणाऱ्या मागासवगीय मुलाला काठीने तोंडावर मारून होटाचे रक्त काढले,तसेच दिनांक. १३/०७/२०२३ रोजी ऋषी अमोल शिंदे इ. १ली वर्गामध्ये शिकणाऱ्या पारधी समाजाच्या मुलाला कपाळावर मारून जखम केली आहे. सदरील विद्यार्थ्याला कपाळावर दोन टाके पडले आहेत.आश्रम शाळेत गरीब, अनाथ, मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अशा मुलांना क्रूरपणाने मारणे योग्य नाही,विनाकारण अधीक्षक विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्यामुळे भीतीपोटी विद्यार्थी शाळेत जाण्यास तयार नाहीत. विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहे,संबंधित अधीक्षक यांच्यावर पोलिस ठाणे तुळजापूर येथे गुन्हा नोंद झालेला आहे. परंतु सदरील आश्रम शाळेतील मुख्याध्यापक कोरे. टी. व्ही,यांनी कसल्याच प्रकारची कार्यवाही केलेली नाही. या उलट अधीक्षक गिरासे. वाय. बी यांना साथ देत आहेत. मुख्याध्यापकास व अधिक्षकास निलंबित करावे,अन्यथा भिम- अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने आपल्या जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयासमोर उग्र पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, या निवेदनावर जयराज क्षिरसागर,राम कांबळे,विशाल शेंडगे,जयराज झोंबाडे,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments