Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेजमध्ये श्री काशिनाथ देवधर यांचे व्याख्यान व विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेजमध्ये श्री काशिनाथ देवधर यांचे व्याख्यान व विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न


धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेजमध्ये श्री. काशिनाथ देवधर यांचे व्याख्यान आणि स्वातंत्र्य दिन व कै. गुरुवर्य के. टी. पाटील सर यांच्या ११ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती निमित्त घेतल्या गेलेल्या रांगोळी, वक्तृत्व, निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. काशिनाथ देवधर लाभले.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे उपप्राचार्य एस. के. घार्गे सर हे होते. श्री. योगेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक श्री. टी. पी. हाजगुडे सर, जेईई-नीट फाऊंडेशन प्रमुख श्री. व्ही. जी. आंबेवाडीकर, श्री. प्रणव देवधर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी व्यासपीठावरून संरक्षण क्षेत्रामध्ये ४० वर्षे घालविलेल्या श्री. देवधर यांनी अर्मामेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर मध्ये कार्यरत असताना जवानांच्या हातातील शस्त्र उत्तम दर्जाचे असावे म्हणून त्यांनी ८४ एमएम लाईट वेट लाँचर या गनची निर्मिती आणि रेखाटन केले. त्यांना खांद्यावरील लाँचरचे वजन २६ किलोग्रॅम वरून १४ किलोग्रॅमवर आणण्यात यश आले. त्यांचा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी अगदी जवळून संबंध आला. त्यांनी भारतात सुरुवातीला तयार झालेली क्षेपणास्त्रे ते  सध्याच्या चांद्रयान ३ मोहिमेबद्दल सखोल माहिती दिली. त्यांच्या 'स्फोटकाला कोणी शत्रू किंवा मित्र नसतो' या विधानाने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. गन एक्स्पर्ट म्हणून ओळख असलेले श्री. देवधर हे प्रोजेक्ट ऑफिसर, डिव्हीजनल हेड अशा जवाबदाऱ्या पार पाडत ते पुण्याच्या एआरडीई मधून निवृत्त झाले. कार्यक्रमामध्ये योगेश कुलकर्णी यांनी एका शिवगीताचे गायन करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. उपप्राचार्य श्री. घार्गे सर यांनी भूगोल या विषयावर तसेच २३ ऑगस्ट रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या एका विशेष कार्यक्रमाची माहिती दिली. 

यावेळी कला व वाणिज्य शाखेतील प्रा. एम. पी. काळे सर,  प्रा. कोरके के. के. सर, प्रा. गोरे सर, प्रा. मोहिते सर, प्रा.पाटील सर, प्रा. भोसले सर, प्रा. लोमटे ए. ए. सर, प्रा. खुने सर, प्रा. शिंदे सर, प्रा. बी. एस. नन्नवरे सर, प्रा. सौ. जाधव मॅडम, प्रा. सौ. वाडकर मॅडम, प्रा. सौ. शेळके मॅडम आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. श्री. घोडके सर यांनी केले तर आभार कला व वाणिज्य विभाग प्रमुख श्री. एन. आर. नन्नवरे सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री.एस. एस. देशमुख सर, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील सर व संस्था अध्यक्ष मा. सुधीर आण्णा पाटील सर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचेही सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments