नातेपुते येथील उपक्रमशील कन्या शाळेत दुसरी शिक्षण परिषद
नातेपुते प्रतिनिधी : नातेपुते येथील कन्याशाळा नातेपुते केंद्राची दुसरी शिक्षण परिषद घेण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत गाऊन सर्वांचे स्वागत केले, इंग्रजीमध्ये अतिशय उत्कृष्ट परिपाठाचे सादरीकरण केले .
दिपक गायकवाड यांनी विद्या समीक्षा अंतर्गत Swiftchat app download करून सर्व प्रकारची माहिती दिली. अंकुश कोळी यांनी पायाभूत चाचणी व साप्ताहिक वर्तमानपत्र याविषयी मार्गदर्शन केले विनोद चंदनशिवे विषयतज्ज्ञ बी.आर.सी.माळशिरस यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी माहिती दिली विनायक सुर्वे यांनी जिल्हा परिषद शाळा व शिक्षकांचे कौतुक केले
सर्व शाळांचे मुख्याध्यापक बाबर विनोद चंदनशिवे अंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विनायक सुर्वे
तसेच सोलापूर जिल्हा शिक्षण पतसंस्था यांच्याकडून श्रीमती. चारुशीला गंभीरे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कन्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी राहुल दीक्षित इयत्ता 7 वी हिचा राज्यस्तरीय सामान्य ज्ञान मंथन परीक्षा 2023 केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बाबर सरांनी भूषविले व प्रमुख पाहुण. विनोद चंदनशिवे लाभले.
विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.सौ. बालिका गायकवाड व श्रीमती. दिपाली दहिवाळ यांनी रांगोळी व उत्कृष्ट फलक लेखन केले.कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनंदा जाधव मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.
0 Comments