तुळजापुर शहरातील कुठलाही विकासात्मक बदल शहरवासियांच्या सर्वानुमतेच होईल -आ. राणाजगजीतसिंह पाटील यांचे निवेदनकर्त्यां मार्फत शहरवासियांना आश्वासन
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर
तुळजापुर : शहरात झालेल्या दि,२९ रोजी जनता दरबार मध्ये तुळजापूर शहरातील समस्त पुजारी, व्यापारी व नागरिक हे नव्याने होत असलेल्या विविध विकास कामा बाबतीत निवेदन देण्यासाठी आले होते.
यामध्ये विशेष करून घाटशीळ पार्किंग येथे प्रास्तावित असणाऱ्या दर्शन मंडपास हरकत असले बाबतीत निवेदन निवेदन देण्यात आले.
यावेळी सर्व पुजारी, व्यापारी व नागरिक यांनी एकत्र बसून दर्शन मंडपसाठी योग्य जागा सुचवावी त्यानुसार संबंधित अधिकारी जागेची नकाशासह पाहणी करतील त्यानंतर चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आमदार मा. श्री राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांनी दिले. त्या अनुशंगाने आज दि ३० रोजी मा.जिल्हाधिकारी यांनी श्री तुळजा भवानी मंदीरा मध्ये बैठक आयोजीत करुन नव्याने दर्शन मंडपाच्या जागे संबंधी समिती घठीत केली सदरील समिती मध्ये *उप विभागीय अधिकिरी,तहसिलदार तसेच मंदीर तहसिलदार,नगर परिषद मुख्याधिकारी,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,सहाय्यक व्यवस्थापक,संचालक स्र्टकचर डिझाईनरअँन्डकन्सल्टंट प्रा. ली तुर्बे नवी मुंबई,सर्व महंत ,तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष आदींची समिती करुन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सुचवल्या प्रमाने प्रस्तावित दर्शन मंडपा बाबत नवी जागा पहाणी करणे व काही स्थानिक नागरिक यांचेशी चर्चा करुन सविस्तर अहवाल निम्नस्वाक्षरीतांकडे सादर करणे करीता समिती गठीत केली आहे. लवकर वरील गठीत केलेली समीती शहरात पुजार्यांच्या नव्याने मागणी केलेल्या दर्शन मंडपाच्या जागेसाठी पहाणी करणार आहे असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगीतले आहे.
0 Comments