Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव येथील पोस्ट कार्यालयात ‘तिरंगा’ ध्वज विक्रीसाठी दाखल|Tricolour' flag entered for sale at post office at Dharashiv

धाराशिव येथील पोस्ट कार्यालयात ‘तिरंगा’ ध्वज विक्रीसाठी दाखल ,नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तिरंगा खरेदी करावा - भाजपा जिल्हाध्यक्ष चालुक्य यांचे आवाहन 

प्रतिनिधि रुपेश डोलारे धाराशिव 


धाराशिव-देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा 2.0 अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पोस्ट कार्यालयांमधूनही तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. धाराशिव येथील पोस्ट कार्यालयात बुधवारी (दि.9) तिरंगा ध्वज दाखल झालेला आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील यांनी पोस्ट कार्यालयातून नागरिकांनी तिरंगा ध्वज खरेदी करावा असे आवाहन श्री.चालुक्य यांनी केले.

यावेळी पोस्ट कार्यालयाच्या वतीने तिरंगा ध्वज विक्री प्रक्रियेविषयी माहिती दिली. प्रारंभी श्री.चालुक्य यांच्यासह उपस्थित पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, सतीश देशमुख, रामदास कोळगे, दत्ता राजमाने, सुनील काकडे, इंद्रजित देवकते, प्रवीण पाठक, प्रभाकर मुळे, विनोद गपाट, शिवाजी गिड्डे, राहुल काकडे, वैभव हंचाटे, विनोद निंबाळकर, संदीप इंगळे, बाबासाहेब देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पोस्ट कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments