उमरगा तालुक्यातील नारंगवाडी महसुल मंडळाचा पिकविमा ॲग्रीमसाठी समावेश नसल्यामुळे महसूल मंडळातील शेतकरी करणार रास्ता रोको आंदोलन नाईकचाकुर: जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे, उमरगा तालुक्यातील नारंगवाडी महसूल मंडळ 25 टक्के अग्रीम रक्कमेत समाविष्ट केला नसल्यामुळे दि,१८ सप्टेंबर रोजी लातूर उमरगा रोड वरील नारंगवाडी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याबाबत शेतकऱ्यांनी दि,११ रोजी तहसीलदार उमरगा यांना यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की,
1सप्टेबंर 2023रोजी जिल्ह्यातील 36 महसूल मंडळात 25%अग्रीम रक्कम द्यावी अशी अधिसूचना काढली उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळात मागील एक महिन्यापासून पाऊस पडला नाही पिके करपली उत्पन्नात घट झाली जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे तरीपण कृषी विभागाने महसूल विभागाने नारंगवाडी मंडळ अग्रीम रकमेतून वगळले आहे त्यामुळे मंडळातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय उपविभागी कार्यालय उमरगा आमदार ज्ञानराज चौगुले यांना निवेदन दिले अग्रिम रक्कमेत समाविष्ट करण्यात आला नाही त्यामुळे 18/9/2023रोजी नारंगवाडी मंडळ अग्रीम रक्कम मंजूर नाही झाल्यास नारंगवाडी मंडळातील 17 गावातील शेतकरी नारंगवाडी येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदनात म्हटले आहे .
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळातील नारंगवाडी ,बोरी कवठा सावळसूर ,नाई चाकूर, वागदरी माडज, गुगळगाव, बेट जवळगा, बाबळसुर मातोळा ,भगतवाडी, चिरेवाडी कोळेवाडी ,येथील सोयाबीन चा विमा भरलेले 13029 संख्या आहे 25% ॲग्रीम रक्कमे पासून वंचित आहेत यावेळी नारंगवाडीचे सरपंच शेखर घंटे, नाईचाकूर सरपंच चंद्रकांत स्वामी , अनिल जगताप,नेताजी पाटील ,भीमाशंकर पवार , रमेश पवार,शिवाजी पवार, गोपाळ पवार, स्वाभिमानी शेतकरी युवा तालुका अध्यक्ष शुभम पवार, भरत घाटे ,गोकुळ पवार, राम पाटील अमित पवार संदिप पवार बालाजी पवार आदी शेतकरी उपस्थित होते.
0 Comments