शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा मिळणार; तसेच पावसाने होणाऱ्या नुकसानीच्या पूर्व सूचना नोंदवा जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांचे आवाहन
धाराशिव: जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने 57 मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांसाठी अग्रीमची 25% रक्कम मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यातील 40 मंडळाचा प्रस्ताव मंजूर झाला परंतु सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडूनही पिकाची अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ 25% अग्रीमची अपेक्षा वर न बसता सध्या होत असलेल्या नुकसानी बाबत ही कंपनीकडे पूर्व सूचना नोंदवाव्यात तसेच नोंदणी करताना अतिवृष्टी न म्हणता केवळ पावसाने नुकसान असे कारण नमूद करून त्या दिवशीची तारीख ही नोंदवावी अग्रीन पेक्षा नुकसानीच्या पूर्वसूचनेतून पात्र शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई अधिकची आहे. अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे.
कृषी अधीक्षक माने यांनी बुधवारी दिनांक 27 रोजी पत्रकार परिषद घेऊन 25% अग्रीम मिळण्याची प्रक्रिया सध्याच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पिक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानी बाबत कंपनीकडे पूर्वसूचना कशा पद्धतीने नोंदवावी अशा विविध प्रक्रिये बाबत सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांना आव्हान केले. यावेळी अधिक माहिती देताना श्री माने म्हणाले की ऑगस्ट महिना हा खरीप पिकांचा फुलोऱ्याचा हंगाम असतो याच महिन्यात पावसाचा खंड पडल्याने फुलगळती होऊन शेंगाही घटले आहेत. यामध्ये सध्या 60% पर्यंत उत्पन्नाचे नुकसान दिसत आहे पावसाच्या खंडाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला 40 व नंतर 17 अशा 57 मंडळातील अधिसूचनांचे प्रस्ताव अग्रीम मिळण्यासाठी शासनाकडे पाठवले आहेत. यापैकी दुसऱ्या टप्प्यातील 17 मंडळाचे प्रस्ताव कंपनीकडे अमान्य करण्यात आले आहेत. याबाबतची प्रक्रिया शासन स्तरावर होत राहील परंतु शेतकऱ्यांनी आता 25% ॲग्री मंजूर झाल्यानंतर उर्वरित 75 टक्के नुकसान भरपाई मिळेल हे अपेक्षेवर न राहता सध्याच्या काळात पावसाने नुकसान झाल्यास नियमानुसार 72 तासाच्या आत ऑनलाईन पद्धतीने कंपनीकडे तसेच तेथे काही अडचण आल्यास आपापल्या तालुका कार्यालय विमा कंपनीच्या कार्यालयात पूर्व सूचना लेखी स्वरुपात नोंदवून त्याच्या पोच घ्याव्यात व त्या जपून ठेवण्यात अशी आव्हान श्री माने यांनी केली आहे.
अग्रीमपेक्षा पूर्वसचनेतून शेतकऱ्यांना पायदा(Farmers benefit from pre-emption rather than advance)
यावेळी माहिती देताना श्री .माने यांनी सांगितले की शेतकऱ्यांना 25% अग्री मधून उंबरठा उत्पन्नाच्या आधारे चार ते 6000 रुपयांपर्यंत हेक्टरी भरपाई मिळू शकेल, परंतु पावसाने नुकसान झाल्यास योग्य पद्धतीने पूर्व सूचना नोंदवून, त्याचे कारण देऊन दाद मागावी. याद्वारे नुकसान असेल तर 90% पर्यंत भरपाई कंपनीला द्यावी लागते असे स्पष्ट करत केवळ अग्रीमच्या अपेक्षेवर न राहता सध्याच्या पावसाने नुकसान झाले तर त्याच्याही पूर्व सूचना योग्य पद्धतीने मांडाव्यात अशी आव्हान केले आहे.
शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे पूर्व सूचना देण्यासाठी सहा पर्याय(Six options for farmers to give advance notice to insurance companies)
यावेळी नुकसानीच्या पूर्व सूचना देण्यासाठी सहा पर्याय उपलब्ध असल्याची माहिती श्री माने यांनी दिली आहे. यामध्ये विमा कंपनीच्या मेलवर, व्हाट्सअप क्रमांकावर ,केंद्र सरकारच्या क्रॉप इन्शुरन्स च्या संकेतस्थळावर, टोल फ्री क्रमांक या ऑनलाइन पद्धती बरोबरच विमा कंपनीच्या तालुका कार्यालय, कृषी विभागाच्या तालुका कार्यालयात शेतकरी ऑफलाइन पद्धतीने पूर्वसचना देऊ शकतात. फक्त शेतकऱ्यांनी नुकसानीच्या 72 तासाच्या आत आपल्या पूर्वसूचना वरीलपैकी एका ठिकाणी नोंदवाव्यात त्यांच्या पोहोच जपून ठेवाव्यात अशी आव्हान कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी केले आहे.
0 Comments